अ क्वेशचन ऑफ सायलेन्स (पुस्तक)

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स: द सेक्चुवल इकोनोमिक्स ऑफ मॉर्डन इंडिया हे भारतीय स्त्रीवादी मेरी जॉनजानकी नायर द्वारे संपादित निबंधांचे संग्रह आहे. हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस द्वारे २००० साली प्रकाशित केले गेले.[] या सर्व निबंधांमध्ये लेखक भारतातील लैंगिकतेचे विविध घटक तसेच कायदा, चित्रपटसामाजिक चळवळींमध्ये लैंगिकता कशी रचली जाते याचा उलगडा करून दाखवतात.

सारांश

संपादन

पुस्तकातील सुरुवातीस प्रस्तावनेद्वारे संपादकांनी लैंगिकतेविषयक, भारतातील विविध चर्चाविश्व एकत्र आणतात तसेच हे चर्चाविश्व आधुनिकता व ब्रम्हचर्येच्या आदर्शांना कसे छेदतात हे ही बघतात. प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुस्तकाच्या नावाचे उद्देश भारतात लैंगिकतेसंदर्भात पाळले जाणारे मौनाचे षड्यंत्र समजून घेणे आहे.[] या पुस्तकात प्रेम चौधरी, व्ही.गीथा, रवी वासुदेवनतेजस्विनी निरंजना सारख्या प्रसिद्ध अभ्यासकांचे निबंध आहेत.

योगदान/ प्रतिक्रिया

संपादन

सोशल चेंज या नियतकालिकेत[] (सेज नियतकालिका) आलेल्या पुस्तकाच्या पुनरावलोकनात, पितृसत्तेतील मुलभूत वर्चस्व उलगडण्यासाठी कशा पद्धतीने लेखकांनी विविध ऐतिहासिक व दृश्य साहित्याचे पुनर्वाचन केलेले आहे हे दाखवून दिले आहे.

संदर्भ सूची

संपादन
  1. ^ a b Nair, Janaki; John, Mary E. (2000). A Question of Silence: The Sexual Economies of Modern India (इंग्रजी भाषेत). Zed Books. ISBN 9781856498920.
  2. ^ A., Tellis,. "Book reviews and notices : MARY E. JOHN and JANAKI NAIR, eds., A question of silence? The sexual econom ies of modem India. New Delhi: Kali for Women, 1998. viii + 412 pp. Notes, index. Rs. 420 (hardback)". Contributions to Indian Sociology (इंग्रजी भाषेत). 35 (1). ISSN 0069-9667.CS1 maint: extra punctuation (link)