अवसरी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

  ?अवसरी बुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर आंबेगाव
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

संपादन

पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालणारी पण काहीशी निवांत जीवनशैली गावात आहे. बहुतांश गावकरी हे शेती व्यवसाय करत असून शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. गावापासून उत्तरेला असणाऱ्या चार ते पाच किलोमीटर नदीवरून पाणी आणून बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. तर गावच्या दक्षिणेकडून जाणाऱ्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे मागील पंधरा वर्षात कोरडवाहू असणाऱ्या जमिनी सुद्धा आता सुपीक होऊन ओलिताखाली आल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. शेती बरोबरच अवसरी बुद्रुक गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गावात सर्व नागरिक खेळीमेळीने राहतात.

गावात धार्मिक वृत्तीचे नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने धार्मिक सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जात जातात.

गावातील बहुतांश व्यवहार सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उरकले जातात. दुपारी गाव निवांत असते. शनिवारी गावात बाजाराचा दिवस असतो.

हिंदू पंचांगा प्रमाणे दर वर्षी चैत्र कृष्ण पंचमी ला गावाचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा असते. यात्रेचा सोहोळा प्रेक्षणीय असतो. ग्रामदैवताचे पूजन, बैलगाडा शैर्यती, कुस्तीचा फड, यात्रेचा बाजार असा मोठा सोहोळा असतो. रात्री उशिरा ग्रामदैवतांची पालखी निघते.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

पूर्वीच्या काळी पेशवे काळात या गावांमध्ये सैन्य आरामासाठी थांबत होते म्हणून या गावाला अवसर / अवसरी नाव या गावात पूर्वी वाघांची संख्या खूप मोठी पूर्वीच्या काळी वाघांची अवशेरी असे सुद्धा संबोधले जात होते.

भैरवनाथ मंदिर, देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, गंगा बावडी (आता अस्तित्वात नाही), गावाजवळील मुक्ताईची खिंड आणि खिंडीत ले प्राचीन देवालय, जवळील गणेश डोंगर,पेशवेकालीन हत्तीचा तलावाचे अवशेष. या ठिकाणी गण्या डोंगराच्या बाजूला असलेल्या डोंगरावर सीतेची नान्ही आहे असे म्हंटले जाते.

नागरी सुविधा

संपादन

गावात विस्तृत बाजारपेठ आणि सर्व सोयी सुविधा आहेत.

आंबेगाव तालुक्यात सरळ एका रेषेत या गावात बाजारपेठ होती मात्र करोना काळापासून बाजारपेठ जरी जागेवर असली तरी मंचर शिरूर रस्त्यावर एसटी स्टँड परिसरात आता मोठ्या प्रमाणावर दुकाने झाले आहेत.

जवळपासची गावे

संपादन

गावडेवाडी, टावरेवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळके.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate