अवधूत गुप्ते

(अवधुत गुप्ते या पानावरून पुनर्निर्देशित)

अवधूत गुप्ते (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक आहे. त्याने मराठीहिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्याने मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही त्याने केले आहे.

अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते
आयुष्य
जन्म 19 फेब्रुवारी 1977
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक
पेशा गायकी

सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत हिच्यासोबत त्याने बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला[ संदर्भ हवा ].

चित्रपट कारकीर्द

संपादन

इ.स. २०१० साली चित्रपटगृहांत झळकलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेनामहाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या झेंडा या चित्रपटाची निर्मिती त्याने केली.

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)