अलोरेस (स्थानिक नाव: बहासा अलोर) ही एक ऑस्ट्रोनेशियन भाषा आहे. ही अलोर आणि पूर्व इंडोनेशियातील अलोर द्वीपसमूहाच्या आजुबाजु असलेल्या बेटांवर बोलली जाते. या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या अलोर-पंतर कुटुंबातील गैर-ऑस्ट्रोनेशियन (पपुआन) भाषांपेक्षा ही वगळी भाषा आहे. तसेच ही भाषा अलोर मलय, मलय जातीपासून देखील वेगळी आहे. सध्या या प्रदेशात व्यापक संवादाची भाषा म्हणून अलोरेसची जागा घेत आहे. अलोरेस ही अलोर द्वीपसमूहाच्या किनाऱ्यालगत असलेल्या अनेक स्थलांतरित समुदायांची मूळ भाषा आहे. विशेषतः अलोरवरील अलोर केसिल येथे आणि पंतरवरील बारानुसा आणि मारिका येथे असणाऱ्या स्मुदायांची ही भाषा आहे. या प्रदेशात व्यापार भाषा म्हणूनही ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

अलोरेस
बहासा अलोर
स्थानिक वापर इंडोनेशिया
प्रदेश अलोर द्वीपसमूह
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन भाषा
  • मलायो-पॉलिनेशियन भाषा
    • मध्य-पूर्व मलायो-पॉलिनेशियन भाषा
      • फ्लोरेस-लेम्बाटा भाषा
        • लामाहोलोट
          • अलोरेस - लामलेरा
            • अलोरेस
लिपी लॅटीन
भाषा संकेत

अलोरेसचा लामाहोलोटशी जवळचा संबंध आहे. बहुतेकदा तिची बोली-भाषा म्हणून वर्गीकृत केली जाते.[१] क्लमेर (२०११) सारखे संशोधक, ज्यांना असे आढळून आले की अलोरेसला केवळ अर्धाच मूलभूत शब्दसंग्रह लामाहोलोट सोबत सामायिक करते. ही गोष्ट अलोरेसला वेगळी भाषा वेगळी समजण्यासाठी पुरेसे मानतात.

संदर्भ संपादन

नोट्स संपादन

  1. ^ Klamer, Marian (2012). "Papuan-Austronesian Language Contact: Alorese from an Areal Perspective". In Evans, Nicholas; Klamer, Marian (eds.). Melanesian Languages on the Edge of Asia: Challenges for the 21st Century. Language Documentation & Conservation Special Publication No. 5. University of Hawai'i Press. pp. 72–108. hdl:10125/4561.