अलेक्झांड्रा कोल्लोन्ताई
आलेक्सान्द्रा मिखाइलोव्हना कोल्लोन्ताई (रशियन: Алекса́ндра Миха́йловна Коллонта́й;३१ मार्च, १८७२:सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य - ९ मार्च, १९५२) ही एक रुसी साम्यवादी क्रांतिकारक होती. ती पहिल्यांदा मेन्शेव्हिक पक्षामध्ये, तर १९१५ नन्तर बोल्शेव्हिक पक्षाची सदस्य होती. १९२३ रोजी कोल्लोन्ताई तिची सोवियेत संघाची नॉर्वेमधील राजदूत म्हणून नेमणूक झाली. ह्या दर्जाच्या स्थानावर असलेली ती पहिल्या महिलांमधली एक होती.
अलेक्सान्द्रा कोल्लोन्ताई | |
---|---|
जन्म |
३१ मार्च, १८७२ सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य |
मृत्यू |
९ मार्च, १९५२ |
राष्ट्रीयत्व | रशियन |
ख्याती | लेखिका, राजदूत |
स्वाक्षरी |
सुरुवातीचे आयुष्य
संपादनकोल्लोन्ताई हिचा जन्म ३१ मार्च १८७२ रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तिचे वडील जनरल मिखाइल आलेकसीविच दोमोंतोविच हे युक्रेनच्या कोसॅक कुटुंबातील होते. ते १८७७-७८ च्या रशिया-तुर्कस्तान युद्धात मध्ये घोडदळ अधिकारी होते व रशियाच्या बल्गेरियातील प्रशासनाचे सल्लागार होते. तिची आई आलेक्सांद्रा आंद्रोवना ही दोमोंतोविचची दुसरी बायको होय.
क्रांतिकारी कार्य
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जेव्हा कोलोन्ताई समाजाला पुनर्रचीत करण्याच्या 'मीर',म्हणजे शेतकरी हितगुज, ह्या पद्धतीकडे आकर्शीत झाली, तेव्हा ह्या प्रकारच्या सिद्धांताचे प्रभावी समर्थक १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात फारच थोडे होते. मार्क्सवादाच्या कामगार कल्याण, क्रांतिकारी पद्धतीने सत्ता जिंकण्याचे सिद्धांत, आणि नव औद्योगिक समाज निर्माण करण्याचे भर, हे कोलोन्ताई व रशियातील ईतर पुरोगामी विचारवंतांचे दिशादर्शक होते. तीचे सुरुवातचे कार्य हे बऱ्याच प्रमाणात मर्यादित होते. जसे, ती तिच्या बहिणी झेनियाला आठवड्यातील काही तास एका ग्रंथालयात मदद करायची, जिथे कामगार वर्गाला रविवारी मुलभूत शिक्शण देण्यात यायचे, ज्यामधून समाजवादी विचार हा त्यांच्यापर्यंत पोचवण्यात यायचा. त्याच ग्रंथालयात ती एलेना स्टासोवा नावाच्या सेंट पिटर्सबर्ग मधिल मार्क्सवादी कार्यकर्तीला भेटली.
बाह्य दुवा
संपादन- Kollontoi archive at Marxists.org
- Clements, Barbara Evans (1979). Bolshevik Feminist: The Life of Aleksandra Kollontai. Bloomington: Indiana University Press. ISBN 0-253-31209-4.