अर्धनारीनटेश्वर

शिव आणि पार्वती या दोन्ही देवतांचे संयुक्त अंकन असलेली मूर्ती
(अर्धनारीश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्धनारीनटेश्वर अथवा अर्धनारीश्वर हे शिव पार्वतीचे संयुक्त रूप आहे. यात साधारणत: उजवा भाग हा शिवाचा असतो व डावा भाग पार्वती(उमे)चा असतो.

अर्धनारीनटेश्वर

इतिहास

संपादन
 
कुशाणकाळातील अर्धनारीश्वर

अर्धनारीनटेश्वर मूर्ती कुशाणकाळात सर्वप्रथम अंकित केल्या गेलेल्या आढळून येतात. गुप्तकाळात त्यामध्ये सुधारित आणि विकसित रूप दिसून येते. अर्धनारीनटेश्वर या रूपाबद्दल पुराणसाहित्यात वर्णन आदळून येते. भारतातील निवडक शिवमंदिरात अर्धनारीनटेश्वर रूपातील शिव आणि पार्वतीच्या मूर्ती आढळून येतात.

तत्वज्ञानात्मक अर्थ

संपादन

पुरुष आणि प्रकृती या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न तत्वांचे प्रतीक म्हणून शिव आणि पार्वती या दोन देवता ओळखल्या जातात. अर्धनारीश्वर या रूपात त्यांचे अभिन्नत्व दाखविले जाते. या रूपातून शिवात्त्वाचे सर्वसमावेशकत्वसुद्धा दाखविले जाते असेही एक मत प्रचलित आहे.


फोटो गॅलरी

संपादन

हे पहा

संपादन

अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर