अर्जुनी मोरगाव

(अर्जुनीचा राजा या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्जुनी मोरगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक शहर व तसेच येथे नगर परिषद अर्जुनी व तसेच एक उपविभाग आहे. अर्जुनी मोरगाव उपविभागमध्ये दोन तालुके असून प्रसिद्ध नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व इटियाडोह धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोबतच प्रतापगड किल्ला, तिबेट कॅंम्प, चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिर गोंदिया-चंद्रपूर-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गावर घनदाट जंगलामध्ये वसले असून दर मंगळवार व शनिवारला भक्तांची वारी असते. येथुन प्रमुख राज्य महामार्ग ११ (महाराष्ट्र) गेलेला आहे.

  ?अर्जुनी मोरगाव
अर्जुनी
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: तांदुळ नगरी
—  शहर  —
अर्जुनी रेल्वे स्थानक
Map

२०° ४९′ ०३.२२″ N, ८०° ०१′ ५२.१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर नागपुर
मोठे मेट्रो नागपुर
जवळचे शहर गोंदिया
प्रांत विदर्भ
विभाग नागपुर
जिल्हा गोंदिया
लोकसंख्या १६,००० (२०२२)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
उपविभाग अर्जुनी मोरगाव
पंचायत समिती अर्जुनी मोरगाव
तहसील अर्जुनी मोरगाव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१७०१
• +०७१९६
• MH-३५

जाण्यासाठी मार्ग संपादन

  • १.गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर या महाराष्ट्रातील प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आणि राज्य महामार्ग क्रमांक-275 वर आहे.
  • २.अर्जुनी मोरगाव-लाखांदुर-पवनी राज्य महामार्ग क्रमांक-354 वर आहे.
  • ३.अर्जुनी मोरगाव-सानगडी-साकोली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-36 वर आणि राज्य महामार्ग क्रमांक-366 वर आहे.

संस्कृती संपादन

 
अर्जुनीचा राजा

अर्जुनीचा राजा हा महाराष्ट्रातील अर्जुनी मोरगावमधील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती शहरातील अतिशय जोमाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणारा महत्वपूर्ण उत्सव आहे.

हा १० दिवसीय गणेशोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो.