अरुण हळबे
अरुण अनंतराव हळबे (२८ मे, इ.स. १९३४ - मृत्यू:४ डिसेंबर, इ.स. २०१७) हे इतिहास संशोधक, लेखक आणि शिक्षक होते. यवतमाळच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमधून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. ‘शतकातलं यवतमाळ’ या नावाचा संशोधन ग्रंथ त्यांनी लिहिला होता.[१]
लेखन
संपादन- डरकाळी (शिकार कथा),
- गाणहिरा (गायिका हिराबाई बडोदेकर यांच्यावरील चरित्रग्रंथ)
- लोकनायक (बापूजी अणे यांच्यावरील चरित्रग्रंथ)
अनेक वृत्तपत्रांतून हळबे यांनी स्तंभलेखन केले. ‘लोकमत’मधून सातत्याने ‘शतकातलं यवतमाळ’ हे सदर त्यांनी लिहिले.
पुरस्कार
संपादन- भारत सरकारने ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ लोकमत न्यूझ नेटवर्क (५ डिसेंबर २०१७). "इतिहास संशोधक अरुण हळबे यांचे अल्पशा आजाराने निधन". लोकमत. ६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.