अरुण योगीराज (जन्म १९८३) हे म्हैसूर येथील भारतीय शिल्पकार आहेत. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फुटांचा पुतळा कोरला आहे.[१] हा पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीपूर्वी नवी दिल्ली येथे इंडिया गेट[२] येथील अमर जवान ज्योतीच्या मागे स्थापित करण्यात आला होता. इ.स. २०२४ साली अयोध्येच्या राम मंदिरात स्थापनेसाठी त्यांची[३] रामलल्लाची मूर्ती निवडण्यात आली आहे. [४]

शिक्षण आणि पार्श्वभूमी संपादन

अरुण हे मूळचे अग्रहारा, मैसुरु येथील असून[५] म्हैसूर शहरातील शिल्पकारांच्या पाचव्या पिढीत त्यांचा समावेश होतो. त्यांचे वडील योगीराज आणि आजोबा बसवण्णा शिल्पी हे देखील प्रसिद्ध शिल्पकार आहेत.[६] अरुणने एमबीए केलेले असून त्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी कंपनीत देखील काम केले होते. २००८ पासून त्यांनी शिल्पकलेत स्वतःला पूर्णवेळ वाहून घेतले आहे.[६] अरुणचे सुभाषचंद्र बोस पुतळ्याचे काम चालू असतानाच ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले.[७] अरुण यांना एक भाऊ आणि एक बहीण असून त्यांना विजेता नावाची पत्नी देखील आहे.[७][८] त्यांचा शिल्पकार भाऊ सूर्यप्रकाश हे देखील त्यांच्यासोबत म्हैसूरमध्ये राहतात.[८]

कार्य संपादन

त्यांनी यापूर्वी केदारनाथमधील आदि शंकराचार्यांची १२ फूट उंच 3-डी पुतळा, म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकट्टे येथील २१ फूट उंच हनुमान पुतळा, म्हैसूरमध्ये बीआर आंबेडकरांची १५ फूट उंच शिल्पे उभारली आहेत.[९] २०१८ मध्ये कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या,[१०] म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांची पांढरी अमृतशिला पुतळा, नंदीची सहा फूट अखंड मूर्ती आणि बनशंकरी देवीची सहा फूट उंच मूर्ती हे देखील त्यांनी साकारलेली काही उललेखनीय कामे आहेत. २०१६ मध्ये अनावरण झालेल्या जयचामराजेंद्र वोडेयार यांचा १४.५ फूट उंच पांढरा अमृतशीला (संगमरवरी) पुतळा,[१०] म्हैसूरचा राजा नलवाडी कृष्णराजा वाडियार यांच्या ५फुटांच्या अर्धपुतळ्यासह त्यांच्या कलाकृतींपैकी एक प्रसिद्ध आहे.[११]

पुरस्कार संपादन

  • २०१४ मध्ये भारत सरकारचा साउथ झोन यंग आर्टिस्ट अवॉर्ड.[१]
  • म्हैसूर जिल्हा प्रशासनाकडून राज्योथ्सवा पुरस्कार[१२]
  • २०२१ मध्ये कर्नाटक सरकारचा जकनाचारी पुरस्कार मिळाला. [१०]
  • याच सोबत शिल्पा कौस्तुभाचा शिल्पकार संघटनेतर्फे सन्मान देखील करण्यात आला.[१०]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Who is Arun Yogiraj, 5th Generation Sculptor Whose Idol Has Been Selected for Ayodhya's Ram Temple". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-01-02. 2024-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Arun Yogiraj: Meet the MBA-turned sculptor whose Ram idol has been selected for Ayodhya temple". The Economic Times. 2024-01-02. ISSN 0013-0389. 2024-01-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Renowned sculptor Arun Yogiraj's idol of Ram Lalla chosen for Ayodhya's grand temple". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-01-02. 2024-01-02 रोजी पाहिले.
  4. ^ "Who is Arun Yogiraj, sculptor whose Ram Lalla idol selected for grand temple in Ayodhya?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-01-02. 2024-01-02 रोजी पाहिले.
  5. ^ "City sculptor carves 12-ft. statue of 'Adi Shankaracharya'". Star of Mysore (इंग्रजी भाषेत). 2021-06-13. 2024-01-02 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Ayodhya's grand temple: Who is sculptor Arun Yogiraj whose Ram Lalla idol got selected for Garbha Griha". Business Today (इंग्रजी भाषेत). 2024-01-02. 2024-01-02 रोजी पाहिले.
  7. ^ a b Correspondent, Special (2021-10-02). "Sculptor Yogiraj Shilpi dead". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-01-02 रोजी पाहिले.
  8. ^ a b "Sculptor Arun Yogiraj's Ram Lalla will now be Ayodhya Ram Mandir's cynosure". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2024-01-03. 2024-01-03 रोजी पाहिले.
  9. ^ Jaiswal, Arushi (2024-01-01). "Ayodhya Temple: Mysuru sculptor Arun Yogiraj's Ram Lalla idol selected for January 22 installation". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2024-01-02 रोजी पाहिले.
  10. ^ a b c d Mehrotra, Puja (2022-09-13). "MBA to master sculptor — Arun Yogiraj's journey to pulling off 28-ft Netaji statue at India Gate". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2024-01-02 रोजी पाहिले.
  11. ^ "His deft hands shaping Nalwadi's five-feet bust". Star of Mysore (इंग्रजी भाषेत). 2022-02-04. 2024-01-02 रोजी पाहिले.
  12. ^ Kumar, R. Krishna (2021-11-06). "Meet the man who sculpted the statue in Kedarnath unveiled by Modi". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-01-02 रोजी पाहिले.