अरित्र
अरित्र (इंग्रजी: Puppis; पपिस) हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. अरित्र पहिल्यांदा एका मोठ्या तारकासमूहाचा, "जेसन आणि आर्गोनॉट्स"चे जहाज - आर्गो नेव्हिसचा भाग होता. त्याच्या सुरुवातीच्या व्याख्येच्या अनेक शतकांनंतर आर्गो नेव्हिसला फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ निकोलाय लाकाय याने तीन भागात विभागले. त्यांतला एक भाग अरित्र आहे आणि इतर दोन भाग म्हणजे नौकातल आणि नौशीर्ष तारकासमूह.
तारकासमूह | |
अरित्र मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Pup |
---|---|
प्रतीक | जहाजावरील मागचा डेक |
विषुवांश | ७.५ |
क्रांती | −३० |
चतुर्थांश | एसक्यू२ |
क्षेत्रफळ | ६७३ चौ. अंश. (२०वा) |
मुख्य तारे | ९ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ७६ |
ग्रह असणारे तारे | ६ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | १ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ३ |
सर्वात तेजस्वी तारा | ζ Pup (Naos) (२.२५m) |
सर्वात जवळील तारा |
एलएचएस १९८९ (१९.६७ ly, ६.०३ pc) |
मेसिए वस्तू | ३ |
उल्का वर्षाव |
पाय पपिड्स झीटा पपिड्स पपिड्स-व्हेलिड्स |
शेजारील तारकासमूह |
वृक होकायंत्र पारावत नौकातल चित्रफलक नौशीर्ष बृहल्लुब्धक वासुकी |
+४०° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. फेब्रुवारी महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
वैशिष्ट्ये
संपादनतारे
संपादनबायर नाव |
नाव | उगम | अर्थ |
---|---|---|---|
ζ | नाओस | ग्रीक | जहाज |
ξ | अस्मिडिस्क | ग्रीक | उघड्या बोटीच्या बाजूचा वरचा भाग |
ग्रहमाला
संपादनशृंगाश्वमधील ताऱ्यांभोवती अनेक परग्रह सापडले आहेत:
- १ जुलै २००३ रोजी, एचडी ७०६४२ या ताऱ्याभोवती एक परग्रह परिभ्रमण करताना आढळला. तो गुरू ग्रहासारखा आहे, त्याची कक्षा वर्तुळाकार आहे आणि कक्षेचा कालावधी मोठा आहे.
- १७ मे २००६ रोजी, एचडी ६९८३० या ताऱ्याभोवती नेपच्यूनच्या वस्तुमानाएवढ्या वस्तुमानाचे तीन ग्रह सापडले. त्या ताऱ्याच्या मधल्या अणि शेवटच्या ग्रहामध्ये लघुग्रहांचा पट्टादेखील आहे.
- २१ जून २००७ रोजी एनजीसी २४२३ या खुल्या तारकागुच्छामधील पहिला परग्रह एनजीसी २४२३-३ या लाल राक्षसी ताऱ्याभोवती सापडला. ग्रहाचे वस्तुमान गुरूच्या वस्तुमानाच्या १०.६ पट आहे आणि तो २.१ खगोलीय एकक अंतरावरून प्रदक्षिणा करतो.
- २२ सप्टेंबर २००८ रोजी एचडी ६०५३२ या ताऱ्याभोवती दोन गुरूसारखे परग्रह सापडले.
दूर-अंतराळातील वस्तू
संपादनआकाशगंगा अरित्रमधून जात असल्याने त्यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ आहेत. एम४६ आणि एम४७ हे दोन खुले तारकागुच्छ आहेत. एम४७ मधील सर्वात तेजस्वी तारे ६व्या दृश्यप्रतीचे आहेत. मेसिए ९३ (एम९३) हा काहीसा दक्षिणेकडील आणखी एन खुला तारकागुच्छ आहे
एम ४६ हा एक गोलाकार खुला तारकागुच्छ आहे. त्याची सरासरी दृश्यप्रत ६.१ आहे आणि तो पृथ्वीपासून ५४०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे. हा एक समृद्ध तारकागुच्छ आहे. यामध्ये ५० ते १०० तारे असून यातले सर्वात तेजस्वी तारे मध्यम प्रखरतेचे आहेत.[१]
संदर्भ
संपादनस्रोत
संपादन- Levy, David H. (2005), Deep Sky Objects, Prometheus Books, ISBN 1-59102-361-0
- Ian Ridpath and Wil Tirion (2007). Stars and Planets Guide, Collins, London. ISBN 978-0-00-725120-9. Princeton University Press, Princeton. ISBN 978-0-691-13556-4.
- Richard Hinckley Allen, Star Names, Their Lore and Legend, New York, Dover.