मेहबूब हुसेन पटेल

सामाजिक कार्यकर्ते
(अमर शेख या पानावरून पुनर्निर्देशित)


अमर शेख ( ऑक्टोबर २०, १९१६ ते ऑगस्ट २९, १९६९) मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता.[]

मेहबूब हुसेन पटेल
जन्म मेहबूब
२० ऑक्टोबर १९१६
मृत्यू २९ ऑगस्ट १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे अमर शेख
नागरिकत्व भारतीय
पेशा पोवाडे, लावण्या यांचे लेखन आणि गायन
राजकीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष
जोडीदार ज्योती (कुसुम) शामराव जयकर
अपत्ये मल्लिका अमर शेख (कन्या)

कॉम्रेड अमर शेख यांच्‍या राजकीय जीवनाची सुरुवात बार्शी येथून झाली. ते प्रथमतः बार्शीमध्‍ये असलेली राजण मिल गिरणीमध्‍ये कामगार होते.  तेथे सुरू असलेल्‍या आयटक या केंद्रिय कामगार संघटनेची शाखा त्‍या मिलमध्‍ये होती. त्‍या गिरणीसमोर होत असणारे लढे, गेट सभा, आंदोलने यामुळे प्रभावित होत, त्‍यांना डाव्‍या विचारांची आवड निर्माण झाली. कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर या कम्‍युनिस्‍ट नेत्‍याच्‍या मार्गदर्शनाखाली ते तेथील कामगारांना संघटित करू लागले पुढे ते भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाचेही सभासद झाले. त्यांनी बार्शीमध्‍ये शेतसारा वाढीविरुद्ध त्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्‍या नेतृत्‍वाखाली २५ हजारांचा मोर्चा काढला होता. 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इप्‍टा या डाव्‍या विचारांनी चालत असलेल्‍या सांस्‍कृतीक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्‍थापना केली होती.  यामध्‍ये कॉम्रेड अण्‍णा भाऊ साठे, शाहीर द. ना. गव्‍हाणकर यांची जबरदस्‍त साथ लाभली.  अमर शेखा यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली.[] मार्‍क्सवादावर अढळ निष्‍ठा ठेवत संपूर्ण हयात भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षात त्‍यांनी काम केले.

कार्य

संपादन

गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७). स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला.[]स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले.चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला.

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. ⇨ प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.[]

कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीपवख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.

स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे (२००७). मराठी कवी आणि लेखिका मल्लिका अमर शेख ह्या अमर शेख यांच्या कन्या होत. इंदापूर येथे त्यांचे अपघाती निधन झाले.

शाहीर अमर शेख यांची काही ध्वनिमुद्रित गीते

संपादन
  • काय सामना करू तुझ्य
  • बर्फ पेटला हिमालयाला
  • रागारागाने गेलाय्‌ निघून
  • सुटला वादळी वारा

शाहीर अमर शेख यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके व लेख

संपादन
  • ‘संग्राम कवि अमर शेख’ लेखक - डॉ. अक्रम पठाण, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
  • अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)
  • जनतेचा महान कलावंत कॉम्रेड शाहीर अमर शेख (लेखक - प्राध्‍यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे)
  • शाहीर अमर शेख यांचे पोवाडे (लेखक - अजीज नदाफ)
  • बार्शीच्‍या मातीतील कॉम्रेड अमर शेख (लेखक- कॉम्रेड प्रवीण मस्‍तुद)
  • शाहीर अमर शेख ह्यांच्या रचनेतील स्त्री ( लेखक- किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांच्या काव्यप्रदेशातील स्त्री ह्या महाग्रंथात समाविष्ट, अथर्व प्रकाशन जळगाव खानदेश)

शाहीर अमर शेख पुरस्कार

संपादन
  • बार्शीच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दर वर्षी 'शाहीर अमर शेख' यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. आजवार हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती/पुस्तके :-
    • आर्त अनावर (वैचारिक व लालित्यपूर्ण पुस्तक; लेखक - आशुतोष अडोणी)
  • पुण्याच्या फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचातर्फे दिला जाणारा शाहीर अमर शेख पुरस्कार. हा मिळालेल्या व्यक्ती :-
    • अ‍ॅडव्होकेट आयुब शेख
  • इंदापूर येथील भीमा-नीरा विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार. हा मिळालेल्या व्यक्ती :-
    • सांगलीचे शाहीर यशवंत पवार
  • पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
    • गफूर शेख

संदर्भ

संपादन
  1. ^ "अमर शेख कैसे बने प्रतिरोध का बुलंद आवाज?". deccanquest.com. 2020-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ कदम, अविनाश (१६ ऑक्टोबर २०१६). "उपेक्षित लोकशाहीर". लोकसत्ता. २२ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ पोतदार, माधव (२००४.). शाहीर अमर-अण्णा,. पुणे. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ शेख, मलिका अमर (१९९२). सूर एका वादळाचा: शाहीर अमर शेख. मुंबई.