अब्राज अल बैत (अरबी: أبراج البيت‎) हा सौदी अरेबिया देशाच्या मक्का ह्या शहरामधील सात गगनचुंबी इमारतींचा एक समूह आहे. ह्यामधील मक्का घड्याळ मनोरा ही ६०१ मीटर (१,९७२ फूट) उंचीची इमारत आजच्या घडीला जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंचीची इमारत आहे. ह्या मनोऱ्याच्या चारही पृष्ठभागांवर महाकाय घड्याळे असून ही घड्याळे सुमारे २५ किमी अंतरावरून देखील दिसतात. सौदी अरेबिया सरकारने सुमारे १५०० कोटी अमेरिकन डॉलर्स खर्चून ही इमारत उभारली व ती २०१२ साली बांधून पूर्ण झाली. अल-हरम मशीदीपासून जवळच असलेली अब्राज अल-बैत आजच्या घडीला घड्याळे असलेली जगतील सर्वात मोठी इमारत आहे.

अब्राज अल-बैतच्या वरच्या भागात चार मोठी कालदर्शक घड्याळे असून प्रत्येक घड्याळाचा आकार ४३ मीटर × ४३ मीटर (१४१ फूट × १४१ फूट) आहे. उत्तर व दक्षिणेकडून दिसणाऱ्या घड्याळांवर अल्लाहू अहकबर तर पूर्व व पश्चिमेकडून दिसणाऱ्या घड्याळांवर शहादामधील वाक्ये लिहिलेली आहेत.

बाह्य दुवे संपादन

गुणक: 21°25′08″N 39°49′35″E / 21.41889°N 39.82639°E / 21.41889; 39.82639