अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८
अफगाणिस्तान क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. जून २०१७ मध्ये आयसीसी ने अफगाणिस्तान ला पूर्ण सदस्यचा दर्जा दिला. त्यामुळे हा सामना अफगाणिस्तानचा पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८ | |||||
भारत | अफगाणिस्तान | ||||
तारीख | १४ जून २०१८ – १८ जून २०१८ | ||||
संघनायक | अजिंक्य रहाणे | असघर स्तानिकझाई | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
जानेवारी २०१८ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय ने सामना बेंगलुरुत होण्याची घोषणा केली.
संघ
संपादनभारत[१] | अफगाणिस्तान |
---|---|
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन१४-१८ मार्च २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- हा अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना होय.
- असघर स्तानिकझाई, रशीद खान, मोहम्मद शहजाद, जावेद अहमदी, रहमत शाह, हशमातुल्लाह शहिदी, मोहम्मद नबी, अफसर झझई, यामीन अहमदजाई, मुजीब उर रहमान, वफादार (अफगाणिस्तान) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- वफादार (अ) याने अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिला चेंडू टाकला.
- शिखर धवन (भा) कसोटीतच्या पहिल्या दिवशी उपहारापुर्वीच शतक ठोकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.
- यामीन अहमदजाई (अ) याने अफगाणिस्तानसाठी पहिला कसोटी बळी घेतला.
- मोहम्मद शहजाद (अ) ने अफगाणिस्तानची कसोटी क्रिकेटमधील पहिली धाव घेतली.
- मुजीब उर रहमान (अ) स्वतःच्या कसोटी पदार्पणातच प्रथम-श्रेणीत पदार्पण करणारा सहावा तर अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.
- मुजीब उर रहमान (अ) २१व्या शतकात जन्मून कसोटी खेळणारा जगातला पहिला खेळाडू ठरला.
- उमेश यादव (भा) ने १००वा कसोटी बळी घेतला.