अपर्णा वेलणकर
अपर्णा वेलणकर या लोकमत दैनिकाच्या दीपोत्सव नावाच्या दिवाळी अंकाच्या संपादिका आहेत. त्या लेखिकाही असून त्यांनी अनेक अमराठी पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहेत.
पुस्तके
संपादन- इमॅजिनिंग इंडिया (स्वतंत्र; या पुस्तकाला २००७ सालचा ज्ञानदीप पुरस्कार मिळाला आहे)
- द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज (मूळ इंग्लिश, लेखिका : अरुंधती रॉय). या मराठी पुस्तकाला २००३ सालचा फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा पुरस्कार आणि साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
- परवाना (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
- फॉर हिअर, ऑर टू गो? (स्वतंत्र)
- ब्युटी क्वीन (मूळ इंग्रजी, लेखिका : इरा त्रिवेदी)
- द ब्रेड विनर (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस) या मराठी पुस्तकाला २००३ सालचा जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
- लेडीज कूपे (मूळ इंग्रजी, लेखिका : अनिता नायर) या मराठी पुस्तकाला २००५ सालचा रणजित देसाई मिळाला आहे.
- शांताराम (मूळ इंग्रजी, लेखक : ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स)
- शौझिया (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
- सिलेक्टिव्ह मेमरी (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
- स्पाउज् - संसारसुखाचं रहस्य (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
- स्पीडपोस्ट (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)