अनुराधा पाटील
अनुराधा पाटील (५ एप्रिल, १९५३:पहूर, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा - ) या मराठी कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका आहेत. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एस.एस.सी. (इंग्रजी सोडून मॅट्रिक), आर.टी. लेले हायस्कूल, पहूर येथे केले.
Marathi writer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल ५, इ.स. १९५३ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
वीस समीक्षकांनी त्यांच्या कवितांचे दर्शन दादा गोरे संपादित अनुराधा पाटील यांची कविता' या पुस्तकात केले आहे.
प्रकाशित साहित्य
संपादनकविता संग्रह
संपादन- दिगंत (१९८१,१९९०,१९९२)
- तरीही (१९८५, १९९७)
- दिवसेंदिवस (१९९२,१९९७)
- वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (२००५)
- कदाचित अजूनही (२०१७)
प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथा
संपादन- नवसाला पावली डॉक्टरीण
अनुवाद
संपादनपाटील यांच्या कवितांचे हिंदी अनुवाद
- दर असल (२०१२) - अनुवादक - प्रा. निशिकांत ठकार
- अनुराधा पाटिल री टाळवीं मराठी कवितावां : राजस्थानी अनुवाद (२०१८) -
- हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, जपानी इत्यादी भाषांमध्ये व भाषांमधील वाङ्मयीन नियतकालिकांतून अनुवाद प्रसिद्ध. त्यात हिदी व इंग्रजी वाङ्मयीन नियतकालिकांमधून मोठ्या प्रमाणावर अनुवाद प्रसिद्ध.
इतर साहित्य
संपादन- काही कथा
- उडिया कवितांची भाषांतरे
- हिंदी कथा व कवितांची भाषांतरे
- समकालीन कवितेवर समीक्षणपर लेख
- वाङ्मयीन मुलाखती व भाषणे
पुरस्कार
संपादन- 'दिगंत' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाबद्दल पुरस्कार- १९८१
- 'तरीही' साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार - १९८६
- 'तरीही' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार- १९८६
- 'तराही' ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६ - ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्यपुरस्कार - १९९३
- 'दिवसेंदिवस' ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्यपुरस्कार - १९९३
- 'दिवसेंदिवस' ला महाराष्ट्र फाऊंडेशन, न्यूयाॅर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मय लेखनाचा पुरस्कार - १९९४
- शिवार प्रतिष्ठान, जिंतूर या संस्थेचा पहिला संत जनाबाई वाङ्मय पुरस्कार - २००१
- सूर्याेदय सर्वसावेशक मंडळ, जळगाव या संस्थेचा पहिला मराठी साहित्यभूषण पुरस्कार- २०१०
- मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार, कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
- कवी हरिश्चंद्र राय साहनी - दुःखी काव्यपुरस्कार, जालना कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
- साहित्यप्रेमी भगिनीमंडळ, पुणे या संस्थेचा कवितालेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी -२०११
- बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशन, जळगाव या संस्थांचा 'बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मयपुरस्कार पुरस्कार', प्रभावशाली कवी म्हणून - २०११
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा.रा. तांबे पुरस्कार, हयातभर कवितेच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कार्यासाठी. - २०१३
- साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा 'दिवसेंदिवस' या पुस्तकाच्या 'दरअसल' या प्रा. निशिकांत ठकार यांनी केलेल्या अनुवादाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.- २०१४
- 'पळसखेडे येथून नुकताच सुरू झालेला एक लाख रुपयांचा पहिला रानगंध पुरस्कार - २०१८
- दीपा निसळ स्मृतिवाङ्मयपुरस्कार, अहमदनगर - २०१८
- गोमंत विद्या निकेतन, मडगाव, गोवा : कविवर्य कारे 'गोमंती' काव्यपुरस्कार - २०१९
- 'कदाचित अजूनही' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार - २०१९