अण्णा विद्यापीठ
अण्णा विद्यापीठ (तमिळ: அண்ணா பல்கலைக்கழகம்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. चेन्नईच्या गिंडी भागात प्रमुख कॅम्पस असलेले अण्णा विद्यापीठ १९७८ साली मद्रास विद्यापीठामधील ४ कॉलेजांचे एकत्रीकरण करून निर्माण करण्यात आले. ह्या विद्यापीठाला तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई ह्यांचे नाव दिले गेले आहे. अण्णा विद्यापीठाचे चेन्नई व्यतिरिक्त मदुराई, तिरुचिरापल्ली, कोइंबतूर व तिरुनेलवेल्ली येथे देखील कॅम्पस आहेत.
ब्रीदवाक्य | Progress Through Knowledge (ज्ञानामधून प्रगती) |
---|---|
Type | सार्वजनिक विद्यापीठ |
स्थापना | १९७८ |
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास व गिंडी राष्ट्रीय उद्यान अण्णा दिव्यापीठापासून जवळच स्थित आहेत.
प्रसिद्ध माजी विद्यार्थी
संपादन- ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती
- कृष्णम्माचारी श्रीकांत, माजी भारतीय क्रिकेट खेळाडू
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत