अग्निमित्र शुंग
(अग्निमित्र या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
अग्निमित्र शुंग हा शुंग घराण्यातील असून पुष्यमित्र शुंग आणि देवमाला याचा मुलगा होता. जेव्हा विदर्भ देशाचा मांडलिक राजा यज्ञसेन याने त्याचा शुंगसमर्थक असलेला चुलतभाऊ माधवसेन याला कैदी केले त्यावेळी पुष्यमित्राने त्याला विदर्भाच्या मोहिमेवर धाडले. अग्निमित्राने यज्ञसेनाचा युद्धात पराभव केला आणि माधवसेनाला मुक्त केले. त्याचसोबत त्याने विदर्भाच्या राज्याचे दोन भाग केले आणि ते या दोन भावांमध्ये विभागून विदर्भात राजकीय स्थैर्य प्रस्थापित केले.
त्याच्या या मोहिमेचे वर्णन आपणास संस्कृत महाकवी कालिदास याच्या 'मालविका-अग्निमित्र' या नाटकात आढळते.