अकाबा
अकाबा (अरबी: العقبة) हे जॉर्डन देशाचे समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेले एकमेव शहर आहे. अकाबा जॉर्डनच्या दक्षिण भागात अकाबाच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. अकाबा जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून ऐतिहासिक काळात त्याचे नाव आयला होते.
अकाबा العقبة |
|
जॉर्डनमधील शहर | |
देश | जॉर्डन |
प्रांत | अकाबा |
स्थापना वर्ष | इ.स.पूर्व ४००० |
क्षेत्रफळ | ३७५ चौ. किमी (१४५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २० फूट (६.१ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | १,८८,१६० |
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ |
आजच्या घडीला अकाबा जॉर्डनमधील एक प्रमुख शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अकाबाच्या पश्चिमेस इस्रायलचे ऐलात शहर वसले आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-02-07 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील अकाबा पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत