अंजली कीर्तने या एक मराठी लेखिका, कवयित्री आणि लघुपट निर्मात्या आहेत. त्या मूळ मुंबईच्या आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठीत ललित लेखन करायला सुरुवात केली.

अंजली कीर्तने या रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनामध्ये एक संपादक होत्या.

अंजली कीर्तने यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • आठवणी प्रवासाच्या (प्रवासवर्णन)
  • डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्त्व (चरित्रात्मक)
  • डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
  • कॅलिडोस्कोप (प्रवासवर्णन)
  • गानयोगी पंडित द. वि. पलुस्कर
  • चेरी ब्लॉसम (प्रवासवर्णन)
  • दुर्गाबाई रूपशोध (दुर्गा भागवत यांच्या जीवनावरचा एक पाचशे पानी ग्रंथ)
  • पॅशन फ्लॉवर (कथासंग्रह)
  • पाऊलखुणा लघुपटाच्या (अनुभवकथन)
  • माझ्या मनाचे रोजनिशी (आत्मकथनात्मक कादंबरी)
  • लघुपटाची रोजनिशी (अनुभवकथन)
  • वेडा मुलगा आणि शहाणी माकडे (बालवाङ्मय)
  • हिरवी गाणी (कवितासंग्रह)
  • बहुरूपिणी दुर्गा भागवत - चरित्र आणि चित्र (२०१८)

अंजली कीर्तने यांनी निर्माण केलेले लघुपट

संपादन