'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)

'नग्नसत्य' लेखीका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा आंतरवेध घेणारे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.[१] या ग्रंथामध्ये मुख्यत्वे बलात्कारासबंधीत अनेक घटनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बलात्काराच्या प्रश्नाचा शोध लेखीका मुक्ता मनोहर यांनी घेतलेला आहे.

'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध
लेखक मुक्ता अशोक मनोहर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लिंगभाव अभ्यास
प्रकाशन संस्था मनोविकास प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती प्रकाशन प्रथमाव्रुती - आक्टोबर २०११
पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयासाठीचा .....वर्षीसाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे.

मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. ज्यात त्या अनेक केसेस चा आढावा घेऊन अशा घटनांना राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसे हाताळले जाते याची सविस्तरपणे मांडणी करतात. या पुस्तकात बलात्कारी वेताळाची कहाणीच्या स्वरुपात मांडणी केली आहे. बलात्कारी वास्तवाचा वेध म्हणजे बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरा आणि स्वतः स्त्रीयांनाच अशा घटनांना कारणीभूत ठरवल्या जाते, असा प्रयत्न समाज पातळीवर सुरु आहे, हे त्या लक्षात आणून देतात. आणि पुरुष हा कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे लक्षात आणून देतात.

“बलात्काराच्या घटना जेव्हा न्याय मागण्यासाठी न्यायालयाकडे नेल्या जातात, तेव्हा त्यांची कशा प्रकारे खिल्ली उडवली जाते आणि बलात्कारित स्त्रिला वेश्या समजून हि घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, किवा ती स्त्रीच पुरुषांना मोहात पाडते आणि पुरुष विकृतीतून बलात्कार होतो अशी कारणे पुढे येत असल्याचे लेखिका सिद्ध करतात."
बलात्काराच्या समस्येचा शोध घेताना, अशा घटना सत्ता-संबंधातून, जातीच्या कारणावरून, किवा बाजारपेठीय वर्चस्ववाद याला कारणीभूत ठरतात हे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले गेले आहे. परंतु बलात्काराच्या घटने मध्ये पिढीत झालेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना, जनसमुदाय, माध्यमे , आणि काही निवडक लोकांनी घेतलेला आक्षेप यांची भूमिका महत्त्वाची असते.
या पुस्तकात बलात्कारी पुरुषाशी काल्पनिक स्वरुपात संवाद साधून प्रत्यक्षात त्याची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणीसंपादन करा

प्रकाशक पाटकर यांच्या मते चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करताना ते अश्‍लील न होऊ देता कमालीचे भेदक होईल याची काळजी घेतली आहे.[२] पुस्तक लेखनासाठी लेखिकेने विक्रम-वेताळ या लोककथेचा स्वरुप वापरले आहे.[३] प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार सुरुवातीला या स्वरुपामध्ये हा विषय वाचताना अवघडलेपण येते. पण नंतर त्याच्या लवचीकपणाचे फायदे लक्षात येतात. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून कथन करता येणे, विश्लेषण करत केलेली चर्चा, तर कधी आत्मसंवाद, तर . बलात्कारी वेताळाशी पंचवीस रात्रींमध्ये झालेला संवाद असे रूप घेऊन पुस्तक समोर येत असल्यामुळे बलात्काराचे भयानक रूपही थोडे सौम्य आणि वाचनीय होते. लेखनाच्या वेताळ पंचविशी या फॉर्ममुळे लेखन अतिभडक व कर्कश होण्याचा धोका, अथवा दुसरीकडे अतिहळवे होण्याचा आणि विषयाचे गांभीर्य कमी होण्याची भीती आणि तोचतोपणाही येण्याचा धोकाही टळला आहे. [४]

आशयसंपादन करा

मुक्ता मनोहर यांच्या म्हणण्यानुसार व्यापक सामाजिक संदर्भात त्यांनी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. "स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरे नाही. टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत" अशी टीका लेखिका मुक्ता मनोहर त्यांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून करतात. [३]

दीपा कदम यांच्या मतानुसार बलात्काराच्या सत्यघटना कथा स्वरूपामध्ये वाचताना बलात्काराच्या विविध कंगोर्‍यांचा विचार केला गेला आहे. स्त्री आणि पुरुष संबंधाच्या नाण्याची चिकित्सा केवळ बलात्कारापुरती सीमित न ठेवता लेखिकेने मानवी इच्छा, पुरुषी वर्चस्व, भांडवलशाही, चंगळवाद यांच्या चष्म्यातूनदेखील बलात्काराशी संवाद साधला आहे. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, हे प्रमाण मान्य करून बलात्काराच्या घटनेची चिरफाड केली आहे. पुरुषाने जबरदस्तीने स्त्रीवर केलेले आक्रमण किंवा संभोग या वर्तुळाच्या बाहेर जाऊन बलात्काराविषयीची केलेली चर्चा या विषयावर वाचकास विचार करायला भाग पाडते.[५]

नीला शर्मा यांच्या मते घरांघरातल्या लेकी-सुनांना सावधपणाचा मंत्र देण्याबरोबरच पुरुषांना बलात्काराच्या मोहापासून रोखण्याची क्षमतासुद्धा मुक्ता मनोहर यांनी मांडलेल्या कथानकांतून जाणवते.[२]

म.टा.सतंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या सांगण्यानुसार विकासाच्या फूटपट्ट्या लावताना आयटी हब आणि बीपीओजचे चकाकते मनोरे दाखवण्याची पद्धत आहे. पण त्यापाठोपाठ आलेला भयंकर चंगळवाद बलात्काराच्या रूपात प्रकटतो त्याची उदाहरणं देत मुक्ता मनोहर लिखित वेताळ पंचविशी सुरू होते. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरात घडलेल्या घटनांचा संदर्भ देताना या शहरांवर विश्वास टाकत कारकीर्द करायला आलेल्या मुलींच्या वाट्याला आलेले बलात्कार नयना, प्रतिमा आणि ज्योतीच्या उदाहरणांमधून भेटतात. बाणखेले यांच्या मतानुसार गुडगाव तर गुंडांचंच शहर, तर राजधानी दिल्ली आता देशाचं रेप कॅपिटल झालीय. या भागातल्या गॅंग रेपच्या घटना विकासाच्या रंगीत चित्रांमागचं नग्नसत्य उघड करतात.[४] रक्षकच भक्षक होतात हे तर वारंवार दिसणारं वास्तव आहे. पोलिस कोठडीत होणारे मुलीवर बलात्कार, वेश्येचा तिच्या शरीरावर हक्कच नाही अन् तिच्याशी संग करायला तिच्या संमतीचीही गरज नाही, अशा आशयाच्या चर्चा या देशातल्या कोर्टात झडतात. त्याही पुढे जात न्याययंत्रणाही बलात्कारित स्त्रियांकडे पुरुषी नजरेनं पाहते. [४]

मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.[४] बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.

भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.[४]

टीकासंपादन करा

साप्ताहिक सकाळ मध्ये दीपा कदम यांनी त्यांच्या लेखातून, 'पुस्तकात अनेकदा नको इतकी खोलातली माहिती दिली जाते अशी टीका केली आहे.[५] महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार, 'बलात्कारी वेताळ पुस्तकात सतत तो निर्गुण निराकार असल्याचा (कंटाळा यावा इतक्या वेळा) दावा करतो. पण त्याचे सगळे चेहरे लेखिकेने उघड केले आहेत. युद्धखोरी, दहशतवाद, पुरुषसत्ताकता, बाजारपेठेची हुकूमशाही, चंगळवाद, मूलतत्त्ववाद या सगळ्यांशी नाते सांगणार्‍या बलात्कारी वेताळाला संपवण्यासाठी काय करायचे, हे मात्र थोडक्यात गुंडाळले आहे..[४] बुकगंगा डॉट कॉमवरील सर्वसामान्य वाचक संतोष पाटील यांच्या पुस्तक-समीक्षणानुसार पुस्तकाच्या मलपृष्ठावरील दाव्यास अनुसरून बलात्कारी संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली याची माहिती प्रत्यक्ष पुस्तकात मिळत नाही. पुस्तक भारतीय पुरुष प्रधान संस्कृती आणि धर्मग्रंथांवर पुरेशी टीका करत नाही. लेखिकेने एक गंभीर विषय बालिशपणे हाताळला आहे.[६]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "नग्नसत्य: बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. a b नीला शर्मा. "पुरुषी दहशतीमागचे सामाजिक संदर्भ". "ई-सकाळवरील पुरुषी दहशतीमागचे सामाजिक संदर्भ-नीला शर्मा यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट इ.स. २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. a b मुक्ता अशोक मनोहर. "'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध". pp. ३०२. २० ऑगस्ट, इ.स. २०१५ भाप्रवे. दुपारी १५.३० मिनीटे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. a b c d e f प्रगती_बाणखेले. "बलात्कारी वेताळाची न संपणारी कहाणी". "बलात्कारी वेताळाची न संपणारी कहाणी"-प्रगती_बाणखेले यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. a b दीपा_कदम. "एका भीषण वास्तवाचा वेध". "एका भीषण वास्तवाचा वेध-दीपा_कदम यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  6. ^ संतोष_पाटील. "Book Review" (इंग्रजी भाषेत). "बलात्कारी वेताळाची न संपणारी कहाणी"-प्रगती_बाणखेले यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)