मुक्ता मनोहर

मराठी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व सफाई कामगारांच्या संघटक असलेल्या मुक्त अशोक मनोहर यांनी स


कॉम्रेड मुक्ता अशोक मनोहर या एक मराठी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व सफाई कामगारांच्या संघटक आहेत. त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूर येथील वेश्याव्यवसायातील स्त्रियांसाठी त्यानी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे.

वृत्तपत्रीय लेखन

संपादन

रविवार ’सकाळ’च्या सप्ततरंग पुरवणीत ’मी कात टाकली’ या सदरात मुक्ता मनोहर यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. त्यांतील काही लेखांचे मथळे :-

  • अशा आणखी कितीतरी 'मारिया’ आहेत (प्रसिद्धिदिनांक - १० मार्च २०१३)
  • नजिबा, आशा आणि ओसामा (प्रसिद्धिदिनांक - १७ मार्च २०१३)
  • फॅशनच्या दुनियेतलं जळीत (प्रसिद्धिदिनांक - ३ मार्च २०१३)
  • या 'इंडस्ट्री'चे मालक आहेत तरी कुठं? (प्रसिद्धिदिनांक - २४ मार्च २०१३)
  • युक्रेनच्या तरुणी, लेनिन आणि क्लारा (प्रसिद्धिदिनांक - ३१ मार्च २०१३)
  • हत्याकांडं दलितांचीच का? (प्रसिद्धिदिनांक - ९ नोव्हेंबर, २०१४)

मुक्ता मनोहर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन

नाट्य-चित्रनिर्मिती

संपादन
  • गो.पु. देशपांडे यांनी जोतिबा फुले यांच्यावर लिहिलेल्या 'सत्यशोधक' या नाटकाची पुणे महापालिकेच्या कामगार रंगभूमीसाठी निर्मिती मुक्ता मनोहर यांनी केली आहे.
  • कचराकोंडी (माहितीपट)

पुरस्कार

संपादन
  • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
  • ’नग्न सत्य...’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  • वर्ध्याच्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या गेलेला पहिलाच स्त्रीवादी साहित्य पुरस्कार (२०१०-११)
  • मुक्ता मनोहर यांना (पहिला) कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रदान झाला आहे. (३ जून, २०१५)
  • कुदळे फाउंडेशनचा सुनील दत्त पुरस्कार (९ मे, २०१६)

संदर्भ

संपादन