२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका (चौदावी फेरी)

(२०२१ स्कॉटलंड तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही स्कॉटलंडमध्ये १० ते १७ जुलै २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान स्कॉटलंडसह नामिबिया आणि नेपाळ या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही चौदावी फेरी होती.

२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका (चौदावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १०-१७ जुलै २०२२
स्थळ स्कॉटलंड स्कॉटलंड


संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया नेपाळचा ध्वज नेपाळ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघनायक
गेरहार्ड इरास्मुस संदीप लामिछाने रिची बेरिंग्टन

मूलत: ही फेरी जून २०२० मध्ये होणार होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जून २०२१ मध्ये या फेरीचे सामने स्पेनला हलविण्यात आले परंतु पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी सामने जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सामने

संपादन

१ला सामना

संपादन
स्कॉटलंड  
२५८/६ (५० षटके)
वि
  नामिबिया
१८१ (४३ षटके)
स्कॉटलंड ७७ धावांनी विजयी.
टिटवूड, ग्लासगो
पंच: डेव्हिड मॅकलीन (स्कॉ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: साफयान शरीफ (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
  • स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नामिबियाने स्कॉटलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • स्कॉटलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • डिव्हान ला कॉक (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, नामिबिया - ०.


२रा सामना

संपादन
नामिबिया  
२२० (४७.३ षटके)
वि
  नेपाळ
१८० (४६.५ षटके)
आरिफ शेख ५०* (८४)
डेव्हिड विसी २/२४ (६.५ षटके)
नामिबिया ४० धावांनी विजयी.
कॅम्बसडून क्रिकेट मैदान, आयर
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि रायन मिल्ने (स्कॉ)
सामनावीर: यान निकोल लोफ्टी-ईटन (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • नामिबिया आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नेपाळने स्कॉटलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • नामिबियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये नेपाळवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • बसिर अहमद (ने‌) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, नेपाळ - ०.


३रा सामना

संपादन
स्कॉटलंड  
१४४ (४२.५ षटके‌)
वि
  नेपाळ
१४६/५ (२५.१ षटके)
आसिफ शेख ७१ (६२)
गेव्हीन मेन ३/४६ (८ षटके)
नेपाळ ५ गडी राखून विजयी.
टिटवूड, ग्लासगो
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: आसिफ शेख (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • स्कॉटलंड आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नेपाळने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये स्कॉटलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • विश्वचषक लीग दोन गुण : नेपाळ - २, स्कॉटलंड - ०.

४था सामना

संपादन
नामिबिया  
२१५/७ (५० षटके)
वि
  स्कॉटलंड
२१९/७ (४८.५ षटके)
जॅन फ्रायलिंक ६०* (४८)
हमझा ताहिर ३/३८ (१० षटके)
स्कॉटलंड ३ गडी राखून विजयी.
टिटवूड, ग्लासगो
पंच: रायन मिल्ने (स्कॉ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: क्रिस ग्रीव्ह्स (स्कॉटलंड)

५वा सामना

संपादन
नामिबिया  
१९९ (४९.२ षटके)
वि
  नेपाळ
१३६ (३७.५ षटके)
नामिबिया ६३ धावांनी विजयी.
कॅम्बसडून क्रिकेट मैदान, आयर
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: बर्नार्ड स्कोल्टझ (नामिबिया)

६वा सामना

संपादन
नेपाळ  
१२८ (३५.५ षटके)
वि
  स्कॉटलंड
१३०/२ (१९ षटके)
आसिफ शेख ४० (५८)
हमझा ताहिर ४/२६ (७.५ षटके)
कॅलम मॅकलिओड ६४ (२९)
सोमपाल कामी १/२६ (३ षटके)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी.
टिटवूड, ग्लासगो
पंच: रायन मिल्ने (स्कॉ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे