२०१९ हैदराबाद सामूहिक बलात्कार

सामूहिक बलात्कार आणि हत्या
پرینکا ریڈی دا قتل (pnb); 2019ء کی حیدر آباد کی اجتماعی آبرو ریزی (ur); affaire du viol collectif de Hyderabad (fr); האונס הקבוצתי בהיידראבאד (2019) (he); 2019 Hyderabad gang rape (ig); 2019 हैदराबाद सामूहिक बलात्कार मामला (hi); २०१९ हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण (mr); 2019 ਹੈਦਰਾਬਾਦ ਸਮੂਹਿਕ ਬਲਾਤਕਾਰ ਅਤੇ ਕਤਲ (pa); 2019 Hyderabad gang rape case (en); تجاوز گروهی ۲۰۱۹ حیدرآباد (fa); ২০১৯-এর হায়দরাবাদ গণধর্ষণ ও হত্যা (bn); 2019 ஐதராபாத் குழு பாலியல் வல்லுறவுக் கொலை (ta) sexual assault and murder (en); بھارت کا ایک بد ترین اجتماعی عصمت دری کا معاملہ (ur); सामूहिक बलात्कार आणि हत्या (mr)

नोव्हेंबर २०१९ मध्ये हैद्राबादच्या शमशाबाद येथील २६ वर्षीय पशुवैद्य महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण घडले. यावर संपूर्ण भारतभर जनतेने संताप व्यक्त केला.[] २८ नोव्हेंबर २०१९ रोजी तिचा अर्धवट जळलेला मृतदेह शादनगर येथील चटणपल्ली पुलाखाली सापडला. पीडित मुलीचे अवसान तिच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सापडले, त्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.[][] सायबराबाद मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. ६ डिसेंबर रोजी सायबरबाद मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या चार आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्ह्याच्या पुनर्रचनेसाठी नेले. आरोपींनी जेव्हा तिथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथेच त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

२०१९ हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण 
सामूहिक बलात्कार आणि हत्या
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसामूहिक बलात्कार,
हत्या,
criminal case
स्थान शमशाबाद, रंगारेड्डी जिल्हा, तेलंगणा, भारत
तारीखनोव्हेंबर २७, इ.स. २०१९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गुन्हा

संपादन

पीडितेने राजेंद्रनगर मंडळाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी मिळविली होती. ती शमशाबादची रहिवासी होती आणि कोल्लूर गावात सरकारी रुग्णालयात सहाय्यक पशुवैद्य म्हणून काम करत होती. तेलंगणा पोलीस विभागाने सांगितले की, पीडित महिलेने तिची स्कूटर टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ उभी केली होती. तेव्हा दोन लॉरी चालक आणि त्यांच्या सहाय्यकांचे लक्ष तिच्यावर होते. रिमांड रिपोर्टनुसार, ती तिच्या वाहनापासून दूर असताना तिच्या स्कूटरच्या टायर्सपैकी एकातली हवा गेली होती. परत आल्यावर तिने बहिणीला फोन केला. नंतर, आरोपीने - मदत करण्याच्या बहाण्याने, तिच्यावर हल्ला करून तिला जवळच्या झुडुपात ढकलले, जिथे तिच्यावर बलात्कार केला. हैदराबाद आऊटर रिंग रोडवरील शादनगर पुलियाजवळ टोलबूटपासून सुमारे ३० किलोमीटर (१९ मैल) अंतरावर सकाळी दोन ते अडीचच्या दरम्यान या दोघांनी तिचा मृतदेह लॉरीमध्ये भरला आणि तिला जाळले.

नंतरच्या घटना

संपादन

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आणि पीडितेच्या मोबाइल फोनवरून जमा झालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. नंतर आरोपींना चेरलापल्ली मध्यवर्ती कारागृहात चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. १ डिसेंबर २०१९ रोजी तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांनी (के. चंद्रशेखर राव) या गुन्ह्यातील आरोपींवर खटला चालविण्यासाठी वेगवान न्यायालय स्थापन करण्याचे आदेश दिले. बलात्कार आणि हत्येमुळे देशातील बऱ्याच भागांत संताप व्यक्त झाला. बलात्कार आणि बलात्कार करणाऱ्यांविरूद्ध कठोर कायद्यांची मागणी करून जनतेने या घटनेनंतर देशभरात निषेध व जाहीर निदर्शने आयोजित केली होती. या घटनेबद्दल अनेक राजकारण्यांनी धक्का व्यक्त केला. केंद्रीय गृहराज्य राज्यमंत्र्यांनी तेलंगणा पोलिसांवर टीका केली आणि म्हणले आहे की जलदगती न्यायालयांद्वारे त्वरित शिक्षेसाठी कायदे लागू करण्यासाठी भारतीय दंड संहिता आणि गुन्हेगारी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा हेतू आहे.

हे चारही आरोपी पोलीस कोठडीत असताना, बेंगळुरू हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालील ६ डिसेंबर २०१९ रोजी पोलीस चकमकीत मारले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांना गुन्हेगाराच्या पुनर्रचनासाठी त्या ठिकाणी नेण्यात आले होते, त्यातील दोघांनी बंदुका हिसकावून घेत पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये चारही संशयितांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पीडितेच्या कुटूंबाने संशयितांच्या मृत्यूचे स्वागत केले. घटनास्थळावर आणि इतर भागात हजारो लोकांनी आरोपींच्या मृत्यूचा उत्सव साजरा केला. आरोपींच्या कुटुंबीयांना धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उभे केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चकमकीचा तपास सुरू केला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "When will our country be safe for Women?". www.thenewsminute.com. 30 November 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Four rapists shot dead by police after taking them to scene of sex attack". Metro (इंग्रजी भाषेत). 2019-12-06. 2019-12-08 रोजी पाहिले.
  3. ^ Khan, Omar. "Four men confess to gang rape of woman they later burned alive, Indian police say". CNN. 1 December 2019 रोजी पाहिले.