मुख्य मेनू उघडा

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ

2008 Summer Olympics Opening Ceremony 2.jpg

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ बीजिंग राष्ट्रीय मैदानावर ०८.०८.२००८ रोजी रात्री ८.०० (चिनी प्रमाणवेळ) वाजता झाला.[१][२][३] चिनी संस्कृतीत ८ हा आकडा समृद्धी दर्शवतो. ही तारीख व वेळ निवडण्यामागे हे कारण होते[४]

संचलनाचा अनुक्रमसंपादन करा

उद्घाटन समारंभातील संचलनात रुढीनुसार ग्रीसचा संघ सर्वप्रथम असतो तर यजमान देशाचा संघ सगळ्यात शेवटी. त्यादरम्यान इतर सहभागी देश नावानुक्रमे संचलन करतात. बीजिंगमध्ये संचलनाचा अनुक्रम चिनी चित्रलिपीतील नावांप्रमाणे ठरवण्यात आला होता. देशाचे नाव लिहिण्यात किती रेघा काढाव्या लागतात त्यानुसार हा क्रम ठरला.[५] त्यानुसार ऑस्ट्रेलिया (澳大利亚) २०३व्या क्रमांकावर होता कारण 澳 या अक्षरात १६ रेघा आहेत तर झांबिया (赞比亚) तील 赞 अक्षरासाठी १५ रेघा लागतात.[६] चीनमध्ये सहसा अनुक्रम ठरवताना अक्षरांतील रेघांची संख्या हे प्रमाण मानण्यात येते.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदीसंपादन करा