१९९२-९३ शारजा चषक
१९९२-९३ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९२-९३ विल्स चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १-४ फेब्रुवारी १९९३ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन देशांनी भाग घेतला.
१९९२-९३ शारजाह चषक | |
---|---|
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम सामना |
यजमान | संयुक्त अरब अमिराती |
विजेते | पाकिस्तान |
सहभाग | ३ |
सामने | ४ |
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी एक सामना खेळला. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. श्रीलंकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवून अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ११४ धावांनी पराभूत करत चषक जिंकला.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | २ | २ | ० | ० | ० | ४ | ४.९०४ |
श्रीलंका | २ | १ | १ | ० | ० | २ | ५.०११ |
झिम्बाब्वे | २ | ० | २ | ० | ० | ० | ४.८२८ |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादन १ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वेने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अर्शद खान (पाक) आणि गॅव्हिन ब्रायंट (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
संपादन ३ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.
- निशांत रणतुंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अंतिम सामना
संपादन ४ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.