१९८८-८९ शारजा चषक
(१९८८-८९ शारजाह चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९८८-८९ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २३-२४ मार्च १९८९ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांनी भाग घेतला.
१९८८-८९ शारजाह चषक | |
---|---|
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | २ सामन्यांची द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका |
यजमान | संयुक्त अरब अमिराती |
विजेते | पाकिस्तान |
सहभाग | २ |
सामने | २ |
मालिकावीर | सलीम मलिक |
सर्वात जास्त धावा | सलीम मलिक (१७१) |
सर्वात जास्त बळी | इम्रान खान (५) |
स्पर्धा द्विपक्षीय मालिका पद्धतीने खेळवली गेली. दोन्ही संघांनी दोन सामने खेळले. पाकिस्तानने दोन्ही सामन्यात विजय मिळवत चषक जिंकला. पाकिस्तानच्या सलीम मलिक याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नाचा काही हिस्सा पाकिस्तानचे माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल कादिर आणि सलाहुद्दीन यांना देण्यात आला.
सामने
संपादन१ला सामना
संपादन २३ मार्च १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- मुश्ताक अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २४ मार्च १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- निलंथा रत्नायके (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.