१९८६-८७ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २-१० एप्रिल १९८७ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी भाग घेतला.

१९८६-८७ शारजाह चषक
तारीख २ – १० एप्रिल १९८७
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सहभाग
सामने
मालिकावीर ऑस्ट्रेलिया डेव्हिड बून
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया डेव्हिड बून (२०६)
सर्वात जास्त बळी इंग्लंड जॉन एम्बुरी (६)

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. चारही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळले. इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताने प्रत्येकी दोन सामने जिंकले आणि एक गमावला. गुणफलकात तीनही संघांना समान गुण मिळाल्याने धावगतीच्या जोरावर इंग्लंडने चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. विजेत्या इंग्लंड संघाला अठरा हजार सातशे पन्नास पाउंड बक्षीस स्वरूपात मिळाले. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती
  इंग्लंड ४.४६०
  पाकिस्तान ४.१७०
  भारत ४.०७०
  ऑस्ट्रेलिया ३.८००

गट फेरी संपादन

१ला सामना संपादन

२ एप्रिल १९८७
धावफलक
इंग्लंड  
२११/७ (५० षटके)
वि
  भारत
२१४/७ (४८.५ षटके)
क्रिस ब्रॉड ५७ (९४)
रवि शास्त्री ३/४७ (१० षटके)
कपिल देव ६४ (५४)
जॉन एम्बुरी ३/३८ (९.५ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: कपिल देव (भारत)

२रा सामना संपादन

३ एप्रिल १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१७६/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८०/४ (४६.४ षटके)
डेव्हिड बून ७१ (१३२)
मुदस्सर नझर ३/४४ (१० षटके)
जावेद मियांदाद ७४* (९७)
ब्रुस रीड १/२६ (८.४ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • माइक व्हेलेटा (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना संपादन

५ एप्रिल १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१७६/६ (५० षटके)
वि
  भारत
१७७/३ (४२ षटके)
डेव्हिड बून ६२ (११३)
मनिंदरसिंग २/२६ (९ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ८४ (१२९)
स्टीव वॉ १/३३ (८ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

४था सामना संपादन

७ एप्रिल १९८७
धावफलक
पाकिस्तान  
२१७/९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२२०/५ (४७.२ षटके)
जावेद मियांदाद ६० (१०१)
डेव्हिड कॅपेल ३/३८ (१० षटके)
टिम रॉबिन्सन ८३ (१०४)
अब्दुल कादिर ३/४७ (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: टिम रॉबिन्सन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

५वा सामना संपादन

९ एप्रिल १९८७
धावफलक
इंग्लंड  
२३०/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१९/८ (५० षटके)
ग्रॅहाम गूच ८६ (११९)
सायमन ओ'डोनेल १/२७ (८ षटके)
ॲलन बॉर्डर ८४ (१०४)
जॉन एम्बुरी २/३८ (१० षटके)
इंग्लंड ११ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

६वा सामना संपादन

१० एप्रिल १९८७
धावफलक
भारत  
१८३/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८४/२ (४१.४ षटके)
दिलीप वेंगसरकर ९५* (१५१)
इम्रान खान ४/२७ (१० षटके)
सलीम मलिक ६१* (९८)
मनिंदरसिंग १/२८ (१० षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.