१९८६-८७ शारजा चषक
१९८६-८७ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २-१० एप्रिल १९८७ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी भाग घेतला.
१९८६-८७ शारजाह चषक | |
---|---|
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | संयुक्त अरब अमिराती |
विजेते | इंग्लंड |
सहभाग | ४ |
सामने | ६ |
मालिकावीर | डेव्हिड बून |
सर्वात जास्त धावा | डेव्हिड बून (२०६) |
सर्वात जास्त बळी | जॉन एम्बुरी (६) |
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. चारही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळले. इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताने प्रत्येकी दोन सामने जिंकले आणि एक गमावला. गुणफलकात तीनही संघांना समान गुण मिळाल्याने धावगतीच्या जोरावर इंग्लंडने चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. विजेत्या इंग्लंड संघाला अठरा हजार सातशे पन्नास पाउंड बक्षीस स्वरूपात मिळाले. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ४.४६० |
पाकिस्तान | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ४.१७० |
भारत | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ४.०७० |
ऑस्ट्रेलिया | ३ | ० | ३ | ० | ० | ० | ३.८०० |
गट फेरी
संपादन१ला सामना
संपादन २ एप्रिल १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड कॅपेल, नील फेयरब्रदर आणि जेम्स व्हिटेकर (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ३ एप्रिल १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- माइक व्हेलेटा (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन४था सामना
संपादन५वा सामना
संपादन६वा सामना
संपादन