१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक

१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक ही एक क्रिकेट स्पर्धा २२ ते २९ मार्च १९८५ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. इंग्लंडस्थित रोथमन्स कंपनीने ह्या स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतल्याने ह्याला रोथमन्स चषक ह्या नावाने संबोधले गेले. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी भाग घेतला.

१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके)
स्पर्धा प्रकार बाद-फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने
मालिकावीर भारत सुनील गावसकर
सर्वात जास्त धावा पाकिस्तान जावेद मियांदाद (७१)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान इम्रान खान (७)

स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळवली गेली. २९ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव करत चषक जिंकला. तर ३ऱ्या स्थानाकरता झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत ३रे स्थान मिळवले. भारतीय फलंदाज सुनील गावसकर याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या जावेद मियांदाद याने सर्वाधिक ७१ धावा केल्या, तर पाकिस्तानच्याच इम्रान खान याने स्पर्धेतील सर्वाधिक ७ बळी मिळवले. विजेत्या भारतीय संघाला रोख ४५,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस पुरस्कार स्वरूप देण्यात आले.

बाद फेरी

संपादन

१ला उपांत्य सामना

संपादन
२२ मार्च १९८५
धावफलक
भारत  
१२५ (४२.४ षटके)
वि
  पाकिस्तान
८७ (३२.५ षटके)
रमीझ राजा २९ (७१)
कपिल देव ३/१७ (६.५ षटके)
भारत ३८ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

२रा उपांत्य सामना

संपादन
२४ मार्च १९८५
धावफलक
इंग्लंड  
१७७/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७८/८ (५० षटके)
टिम रॉबिन्सन ३७ (७३)
ॲलन बॉर्डर ३/२१ (७ षटके)
ग्रेम वूड ३५ (५०)
फिल एडमंड्स २/३१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ग्रेग मॅथ्यूस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • नॉर्मन गिफर्ड आणि कोलिन वेल्स (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.


३ऱ्या स्थानाकरता सामना

संपादन
२६ मार्च १९८५
धावफलक
पाकिस्तान  
१७५/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१३२ (४८.२ षटके)
जावेद मियांदाद ७१ (११७)
नॉर्मन गिफर्ड ४/२३ (१० षटके)
रॉब बेली ४१* (८३)
शोएब मोहम्मद ३/२० (१० षटके)
पाकिस्तान ४३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • रॉब बेली आणि पॅट पोकॉक (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

अंतिम सामना

संपादन
२९ मार्च १९८५
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१३९ (४२.३ षटके)
वि
  भारत
१४०/७ (३९.२ षटके)
केप्लर वेसल्स ३० (६८)
रवि शास्त्री २/१४ (९.३ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.