१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

१९०० उन्हाळी ऑलिंपिक मधील एकमेव पुरुष क्रिकेट सामना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स ह्या दोन देशांमध्ये पॅरिस मधील व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस या मैदानावर १९-२० ऑगस्ट १९०० या दरम्यान खेळवण्यात आला. हा सामना ग्रेट ब्रिटनने १५८ धावांनी जिंकत सुवर्णपदक जिंकले. ऑलिंपिक इतिहासात क्रिकेट मध्ये सुवर्णपदक जिंकणारे ग्रेट ब्रिटन हे पहिले आणि आजतागायत एकमेव राष्ट्र ठरले. तर उपविजेत्या फ्रान्सने रजतपदक जिंकले.

पुरूष क्रिकेट
ऑलिंपिक खेळ
क्रिकेट
स्थळव्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस, पॅरिस, फ्रान्स
दिनांक१९-२० ऑगस्ट १९००
सहभागी२४ खेळाडू २ देश
पदक विजेते
Gold medal 
Silver medal 

जेव्हा पॅरिस ऑलिंपिक खेळांची घोषणा करण्यात आली तेव्हा क्रिकेट या खेळाला पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये स्थान देण्यात आले. ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्स या चार देशांनी ऑलिंपिक मधील पहिल्या वहिल्या क्रिकेट स्पर्धेसाठी संघ पाठवणार असल्याची घोषणा केली होती . पण ऐनवेळी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांनी स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे यजमान फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये एकमेव दोन-दिवसीय सामना खेळवण्यात आला. ऐतिहासिक कागदपत्रांद्वारे या स्पर्धेत दोन्ही देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग नव्हता घेतला. तर दोन्ही देशातील क्रिकेट क्लब्सनी भाग घेतला होता. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिकृत पदकविजेते पुस्तिकेमध्ये पदके राष्ट्रीय संघांना दिलीत असे नमूद केले आहे.

ब्रिटनतर्फे डेव्हन आणि सॉमरसेट वॉन्डरर्स तर फ्रान्स कडून फ्रेंच खेळाडू क्लब संघ या दोन क्लब्सनी भाग घेतला. दोन-दिवसीय सामना १९ ऑगस्ट १९०० रोजी सुरू झाला. ग्रेट ब्रिटनने पहिल्या डावात ११७ धावा केल्या, आणि फ्रान्सला पहिल्या डावात ७८ धावांवर सर्वबाद केले. दुसऱ्या डावात ग्रेट ब्रिटनने १४५ धावांवर डाव घोषित करत फ्रान्सला १८५ धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात यजमान फ्रान्स सामना थांबायला केवळ ५ मिनिटांचा वेळ असताना २६ धावांवर सर्वबाद झाला. ग्रेट ब्रिटनने सामना १५८ धावांनी जिंकला आणि ऑलिंपिक मध्ये क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन पहिला वहिला देश ठरला. सामना दोन्ही बाजूंनी १२ खेळाडू घेऊन खेळवण्यात आला होता. त्यामुळे सामन्याला प्रथम-श्रेणी दर्जा देण्यात आला नाही.

सहभागी सदस्य

संपादन

पदकविजेते

संपादन
स्पर्धा सुवर्णपदक रजतपदक
क्रिकेट   ग्रेट ब्रिटन (डेव्हन आणि सॉमरसेट वॉन्डरर्स)

सी. बीचक्रॉफ्ट
आर्थर बिर्केट
आल्फ्रेड बॉवरमन
जॉर्ज बक्ली
फ्रान्सिस बर्शेल
फ्रेडेरिक क्रिस्चियन
हॅरी कॉर्नर
फ्रेडेरिक कमिंग
विल्यम डोन
आल्फ्रेड पॉव्सलँड
जॉन साईम्स
मोंटागु टॉलर

  फ्रान्स (फ्रेंच खेळाडू क्लब संघ)

विल्यम अँडरसन
विल्यम अट्रील
जॉन ब्रेड
ब्राउनिंग
रॉबर्ट हॉर्न
टिमोथी जॉर्डन
आर्थर मॅकइव्होय
डग्लस रॉबिंनसन
एफ. रूक्स
ए.जे. निडु
हेन्री टेरी
फिलिप टोमालिन

सुवर्णपदक सामना

संपादन
१९-२० ऑगस्ट १९००
१९०० पॅरिस ऑलिंपिक
धावफलक
वि
११७ (‌- षटके)
फ्रेडेरिक कमिंग ३८
विल्यम ॲंडरसन ४/- (- षटके)
७८ (- षटके)
जॉन ब्रेड २५
फ्रेडेरिक क्रिस्चियन ७/- (- षटके)
१४५/५घो (- षटके)
आल्फ्रेड बॉवरमन ५९
एफ. रूक्स ३/- (- षटके)
२६ (- षटके)
विल्यम ॲंडरसन ८
मोंटागु टॉलर ७/- (- षटके)
ग्रेट ब्रिटन १५८ धावांनी विजयी.
व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस, पॅरिस
पंच: डीर्लोम्न (फ्रा) आणि विलियन (फ्रा)
  • नाणेफेक: नाणेफेक नाही. यजमान फ्रान्सने प्रथम क्षेत्ररक्षण केले.
  • गोलंदाजांनी आणि संघांनी टाकलेल्या एकूण षटकांची संख्या अज्ञात. तसेच गोलंदाजांनी दिलेल्या धावासुद्धा अज्ञात.