१० जनपथ
१०, जनपथ हे दिल्लीच्या जनपथवरील एक सार्वजनिक मालकीचे घर आहे. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येच्या वेळी, ते भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा प्रचार करत असताना, १०, जनपथ हे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते, जरी ते पंतप्रधान असताना ७, लोककल्याण मार्ग येथे राहत होते. १०, जनपथ हे सध्या त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे, ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.[१][२] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(INC)चे राष्ट्रीय मुख्यालय २४, अकबर रोडवर १०, जनपथच्या पाठीमागे आहे.[३]
हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (1964-1966) यांचे निवासस्थान होते. आज त्यांचे चरित्र संग्रहालय, लाल बहादूर शास्त्री स्मारक १, मोतीलाल नेहरू प्लेसला (पूर्वी १०, जनपथ) लागून आहे.[४][५]
१०, जनपथ हे नवी दिल्लीमध्ये १५,१८१ चौ. मीटर जागेत आहे.
इतिहास
संपादनहे घर 1960च्या दशकात जवाहरलाल नेहरूंच्या नंतर आलेले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निवासस्थान होते. संकुलाला लागून, गोलचक्क्यासमोर लाल बहादूर शास्त्री स्मारक 1, मोतीलाल नेहरू प्लेस आहे.[६]
संदर्भ
संपादन- ^ "Sonia Gandhi's power bill: over Rs 7 lakh for 3 years - Hindustan Times". web.archive.org. 2010-11-11. 2010-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "The world according to Sonia". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2003-12-12. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Congress". 2011-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Rediff On The NeT: Janardan Thakur recalls a conversation with the late Kamalapati Tripathi". www.rediff.com. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "The Hindu : Metro Plus Delhi / Tribute : Lest we FORGET..." web.archive.org. 2005-01-22. रोजी मूळ पानापासून संग्रहित2005-01-22. 2022-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Shastri memorial losing out to Sonia security". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2011-01-17. 2022-01-06 रोजी पाहिले.