होला मोहल्ला

(होला मोहल्ला (हल्लाबोल) या पानावरून पुनर्निर्देशित)

होला मोहल्ला हा भारत देशाच्या पंजाब राज्यातील एक सण आहे.[] शीख संप्रदायाचा पहिला धार्मिक कोश महान कोश या नावाने प्रसिद्ध आहे, तो संपादित करणारे भाई कहान सिंग यांनी या कोशात या विशिष्ट सणाबद्दल नोंदविले आहे.[]

आनंदपूर साहिब येथील होला उत्सव

स्वरूप

संपादन
 
आनंदपूर साहिब येथील उत्सव

मार्च महिन्यामध्ये तीन दिवस हा सण जगभरातील शीख बंधू भगिनी उत्साहाने साजरा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी याचा प्रारंभ होतो. खासकरून आनंदपूर साहिब येथे हा उत्सव प्रकर्षाने साजरा होतो. कुस्तीच्या स्पर्धा, गावाबाहेर एकत्र राहणे शबद- कीर्तन ऐकणे, संगीत आणि नृत्याचा आनंद असे या सणाचे स्वरूप पहायला मिळते. गुरुद्वारा या पवित्र ठिकाणी ओळीत बसून सर्व भाविक लंगर म्हणजे एकत्रितपणे शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात. या उत्सवाची सांगता सैन्याच्या संचलनाप्रमाणे एका संचलनाने केली जाते. केशगढ साहिब या तख्तापर्यत ही मिरवणूक काढली जाते. शौर्य दाखविणाऱ्या घोड्यांच्या शर्यती, धनुष्यबाण चालविण्याच्या स्पर्धा, यांचे आयोजन होते तसेच जत्राही भरते.[]

सणाचे महत्त्व

संपादन

होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो. गुरू गोविंद सिंह यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले.[] त्यापूर्वीच्या शीख गुरूंनी एकमेकांवर फुले अथवा गुलाल उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.[] भक्त प्रल्हादाच्या पौराणिक कथेचा समावेश संत नामदेव यांच्या संपर्कातून गुरू ग्रंथ साहिब यात आलेला आहे त्यामुळे होळीचा हा पौराणिक संदर्भही शीख समुदायात प्रसिद्ध आहे.[]

निहंग सिंग

संपादन
 
निहंग सिंग समुदाय

या सणामध्ये खालसा पंथाच्या सैन्याचे पारंपरिक पोशाख घातलेले सदस्य दिसतात. गडद निळ्या रंगाचा पोशाख आणि पारंपरिक पगडी परिधान केलेले सदस्य या उत्सवातील महत्त्वाचा केंद्रबिंदू मानले जातात.

रंगांचा उत्सव

संपादन

गुरू गोविंद सिंह यांनी गुलालाचा वापर करून हा सण साजरा केला होता. त्या जोडीने भाई नंद लाल या गोविंद सिंह यांच्या राजकवीने केलेल्या वर्णनानुसार केशर, कस्तुरी, गुलाब पाणी यांचा वापर करून होळीचा आनंद घेतला जाता असे. आधुनिक काळात निहंग सिंग सदस्य एकमेकांवर आणि उपस्थित जमावावर गुलाल उधळतात.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Hola Mohalla - Hola Mohalla in Punjab, Hola Mohalla Celebrations, Hola Mohalla Festival". www.holifestival.org. 2021-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ a b "The clarion call of colours". The Week (इंग्रजी भाषेत). 2021-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Holi 2019: क्‍या है सिखों का होला महल्ला". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
  4. ^ "होला मोहल्ला: कब और कैसे हुई शुरूआत, जानें कथा". punjabkesari. 2018-03-02. 2021-03-24 रोजी पाहिले.
  5. ^ Lorenzen, David N. (1996-01-01). Praises to a Formless God: Nirguni Texts from North India (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-0-7914-2805-4.
  6. ^ Punjab (India) (1987). Punjab District Gazetteers: Rupnagar (इंग्रजी भाषेत). Controller of Print. and Stationery.