एक पिष्टमय पदार्थ. याचा रंग गुलाबी असतो. याचा वापर देवपूजेत होतो. गुलाल हे एक ताबंड्या रंगाचे आणि मृदु असे चूर्ण असते. जत्रा वगैरे महोत्सवात एकमेकांच्या अंगावर उडविण्यासाठी याचा उपयोग करतात. मंगलकार्यातही गुलाल वापरतात. तांदुळाच्या अगर शिरगोळयाच्या मुकटीला तांबडा रंग देऊन गुलाल बनवतात. कधी कधी शाडूच्या माती पासूनही तो तयार करतात.

पुष्कर येथे उधळलेला गुलाल

संदर्भ भारतीय कोश

संपादन