होन्झोन
होन्झोन (本尊), याला कधी कधी गोहोनझोन म्हणून देखील ओळखले जाते. हे जपानी बौद्ध धर्माची मुख्य देवस्थान [१][२] किंवा मुख्य देवता आहे [१] बुद्ध, बोधिसत्त्व किंवा मंडळची प्रतिमा मंदिरात किंवा घरगुती बुट्सुदनमध्ये स्थित असते.[३]
प्रतिमा म्हणजे एकतर पुतळा किंवा छोटीसी कागदाची किंवा चर्मपत्राची गुंडाळी असू शकते. ही गोष्ट पंथाप्रमाणे भिन्न भिन्न बदलते. प्रतिमा एकल प्रतिमा किंवा प्रतिमांचा समूह असू शकतो. होन्झोन प्रतिमा मंदिरातील मुख्य (होन्डू) हॉल किंवा खजिन्याचा (कोन्डू) हॉल मध्ये असते. त्याची उपस्थिती विशिष्ट हॉल किंवा संपूर्ण मंदिरासाठी असते. कधी कधी होन्झोन ही केंद्रीय प्रतिमा (जिला चुस्सॉन म्हणतात) ही तीन (सॅनझॉनबुटु) किंवा पाच (गोसॉन) प्रतिमांचा समूह असते.
मुर्तीच्या निर्मितीनंतर अभिषेक सोहळा होतो, ज्याला कैजेन म्हणतात. कैजेनच शब्दशः अर्थ 'डोळे उघडणे' असा होतोत्. असे मानले जाते की कैजेन नंतर होन्झोन हे पात्रामध्ये रूपांतरित करते ज्यात पवित्र शक्ती वास करू शकते..[४]
बुत्सुझा
संपादनहोन्झोन ज्या पुतळ्याचे रूप घेतो त्याला बुत्सुझा(जपानी:仏像 ) म्हणतात. हे बहुधा सिप्रसच्या लाकडापासून किंवा तांबे किंवा कांस्य सारख्या धातूपासून बनविला गेलेला असतो. इतर प्रकारच्या प्रतिमांपेक्षा बुत्सुझा मोठ्या प्रमाणात आढळतो.[५] तोरी बुशी हे अशा प्रकारच्या मुर्तींचे सुरुवातीचे प्रख्यात निर्माता होते. बुत्सुझोझुइ हा ग्रंथ १६९० मध्ये प्रकाशित झाला. यात ८०० बुत्सुझांच्या पुनरुत्पादनांचे संकलन आहे.
विविध पंथांमध्ये
संपादनसहाव्या शतकापर्यंत जपानमध्ये बौद्ध धर्म प्रचलित नव्हता. तो पर्यंत होन्झोनचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही शिन्तो धर्मा मध्ये तो पर्यंत होन्झोनचा उल्लेख नव्हता. हा एक बौद्ध धर्माचा सांस्कृतिक प्रभाव होता.[६] जपानी बौद्ध धर्माच्या प्रत्येक संप्रदायाचा स्वतःचा होन्झोन असतो जो मंदिरानुसार बदलत जातो. कधी कधी एकाच मंदिरात प्रत्येक हॉलमध्येही बदललेला असतो. ही प्रथा २० व्या शतकातील जपानी धार्मिक सुधारक, एकाई कावागुची यांना मान्य नव्हती.[७]
काही प्रतिमा (हिबुत्सू, शब्दशः अर्थ "गुप्त बुद्ध") खूप पवित्र मानलेले असल्यामुळे सार्वजनिक सादरीकरणासाठी निषिद्ध आहेत.[८][९]
शिंगन बौद्ध
संपादनमिक्क्यो पंथ शिंगॉन बौद्धाला मानतात. यानुसार विधींना देवानुसार मानले जाते. जेव्हा काकाईने ९व्या शतकात शिंगॉन एस्टेरिक बौद्ध आणि त्याचा बौद्ध पँथियन जपानमध्ये आणला तेव्हा चीनमध्ये सापडलेल्या पुतळ्याच्या पूजेच्या पद्धतींचा समावेश केला गेला.[१०][११] शतकानुशतके हे जपानी बौद्ध मंडपात विकसित झाले.
शिकवणीसंबंधी आकृतीची भूमिका तिबेटी बौद्ध धर्माच्या येडम सारखीच आहे. मिक्की, टांग्मी आणि तिबेट बौद्ध यांच्यासह वज्रयान बौद्ध धर्मातील देवता देवता अनेक धार्मिक प्रथांना महत्त्व देतात. [ <span title="This claim needs references to reliable sources. (June 2017)">उद्धरण आवश्यक</span> ]
शुद्ध भूमी बौद्ध
संपादनशिंशू जोडो पंथामध्ये शुद्ध भूमी बौद्ध मानला जातो. होनेन आणि शिनरन या धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली होन्झोनचा वापर अधिक प्रचलित झाला. या पंथानुसार होन्झोनचे विविध रुपे मानली आहेत, जसे की, मंत्र, नमु अमीदा बुद्धाचे शिलालेख, त्यांची इतर वाक्ये, बुद्धांच्या प्रतिमा आणि संस्थापकाची प्रतिनिधिक.[१२]
रिशो कोसेकाई
संपादनरिशो कोसे काई नुसार सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये बसविलेल्या होन्झोनला पुजण्याचा अधिकार असतो. ज्याला त्यांनी "डायगोहोंझोन" असे नाव दिले आहे. यात शाक्यमुनींची [१३][१४] प्रतिमा असलेली कागदाची किंवा चर्मपत्राची गुंडाळी असू शकते. रिशो कोसे-काई मुख्यालयात शाक्यमुनींचा एक पुतळा गोहोनझोन आहे.[१५]
झेन बौद्ध धर्म
संपादनसुझुकीच्या मते, झेन वेदीसाठी योग्य होन्झोन म्हणजे शाक्यमुनी बुद्ध आहे. यात अनेकदा बोधिसत्व आणि अर्हत यांच्या माध्यमातून यांना दर्शविले जाते. मंदिराच्या मार्गदर्शक तत्त्वनुसार इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.[१६]
हे सुद्धा पहा
संपादन- बुद्धरूप
- बुत्सुदान
- पंथ प्रतिमा
- गोहोंझोन (निचिरेन बौद्ध)
- मूर्ती
- प्राण प्रतिष्ठा
- थांगका
संदर्भ
संपादन- ^ a b Sharf, Robert H. (2001). Living images : Japanese Buddhist icons in context (Orig. print. ed.). Stanford, Calif.: Stanford Univ. Press. p. 3. ISBN 9780804739894.
- ^ Harding, edited by John S. (2012). Studying Buddhism in practice. London: Routledge. p. 82. ISBN 9781136501890.CS1 maint: extra text: authors list (link)
- ^ Borup, Jørn (2008). Japanese Rinzai Zen Buddhism : Myōshinji, a living religion ([Online-Ausg.]. ed.). Leiden: Brill. p. 8. ISBN 9789004165571.
- ^ Boldrick, Stacy; Brubaker, Leslie; Clay, Richard (2013). Striking images, iconoclasms past and present. Farnham [u.a.]: Ashgate. p. 43. ISBN 9781472413673.
- ^ Horton, Sarah J. (2007). Living Buddhist statues in early medieval and modern Japan (1st ed.). New York: Palgrave Macmillan. pp. 1–2. ISBN 9780230607149.
- ^ Kleiner, Fred S. (2010). Gardner's art through the ages : non-Western perspective (13th ed., Custom ed. for Santa Barbara City College ed.). [Boston, Mass.]: Wadsworth Cengage Learning. p. 89. ISBN 9780495573678.
- ^ Auerback, Micah L. (2016). A Storied Sage: Canon and Creation in the Making of a Japanese Buddha. University of Chicago Press. p. 4. ISBN 9780226286389.
Kawaguchi recounted these details to illustrate the absurdity and disorder resulting from the lack of any single, unifying focus of devotion in Japanese Buddhism. His enumeration begins with deities inherited from India: transcendent, "cosmic" buddhas, and bodhisattvas, "wisdom-beings" who serve as compassionate saviors. The "Great Masters" whom he mentions each stand as the font of a different Buddhist denomination; in each case, the extraordinary life and works of the founder earned him a place as an object of devotion in his own right. The remaining "extreme cases" include a celebrated warrior of medieval Japan, along with lowly trickster animals, among a legion of Indian deities brought to Japan as part of the broader Buddhist pantheon.
- ^ Weinstein, Lucie R. (1989). [The Yumedono Kannon: Problems in Seventh-Century Sculpture], Archives of Asian Art 42, 29
- ^ Rambelli, Fabio (2002). Secret Buddhas: The Limits of Buddhist Representation, Monumenta Nipponica 57 (3), 271-307
- ^ Bogel, Cynthea J. (2009). With a Single Glance: Buddhist Icon and Early Mikkyō Vision. University of Washington Press. p. 197. ISBN 9780295989204.
University of Washington Press, 2009
- ^ The body: toward an Eastern mind-body theory Yasuo Yuasa, Thomas P. Kasulis p.125
- ^ Blum, Mark L. (ed.); Yasutomi, Shinʼya (2005). Rennyo and the Roots of Modern Japanese Buddhism. Oxford: Oxford University Press, USA. ISBN 9780195350999.CS1 maint: extra text: authors list (link)
- ^ Dharma World, Volume 12. Kosei Publishing Company. 1985.
- ^ Guthrie, Stewart (1988). A Japanese new religion: Risshō Kōsei-kai in a mountain hamlet. Ann Arbor: Center for Japanese Studies, the University of Michigan. p. 120.
- ^ Stewart Guthrie. "A Japanese new religion : Risshō Kōsei-kai in a mountain hamlet". p. 136. 2017-05-29 रोजी पाहिले.
- ^ Suzuki, Daisetz Teitaro (2005). Manual of Zen Buddhism (PDF). Buddha Dharma Education Association. pp. 108–109.
पुढील वाचन
संपादन- चिबा, जोरीयू (1991). होनझॉन-ऑब्जेक्ट ऑफ पूजा ऑफ शिन बौद्ध, पॅसिफिक वर्ल्ड: जर्नल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ बौद्ध स्टडीज, नवीन मालिका 7, 90-93
- ग्रोटेनहुइस, एलिझाबेथ टेन (1999) जपानी मंडले: पवित्र भूगोलचे प्रतिनिधित्व, होनोलुलु: युनिव्हर्सिटी ऑफ हवाई'ए प्रेस
- हॉर्टन, एस. (2007) लवकर मध्ययुगीन आणि आधुनिक जपानमध्ये बौद्ध पुतळे राहतात. स्प्रिंगर
- रॅमबेली, फॅबिओ (2010) मुख्य बुद्ध: जपानी बौद्ध कुटुंबातील पवित्र लोकांच्या प्रतिनिधित्वाची ऐतिहासिक प्रक्रिया आणि पद्धती, जपानी धर्म 35 (1-2), 63-86