हेलन हेस
हेलन हेस मॅकआर्थर (पुर्वाश्रमीच्या ब्राऊन; १० ऑक्टोबर १९०० - १७ मार्च १९९३) एक अमेरिकन अभिनेत्री होती जिची कारकीर्द ८२ वर्षांची होती. तिला अखेरीस "फर्स्ट लेडी ऑफ अमेरिकन थिएटर" हे टोपणनाव मिळाले होते आणि एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी अवॉर्ड जिंकणारी दुसरी व्यक्ती आणि पहिली महिला होती. अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकणारी ती पहिली व्यक्ती होती. हेस यांना १९८६ मध्ये राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन यांच्याकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्राप्त झाला.[१] १९८८ मध्ये तिला नॅशनल मेडल ऑफ आर्ट्सने सन्मानित करण्यात आले.
American actress (1900–1993) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Helen Hayes |
---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर १०, इ.स. १९०० वॉशिंग्टन |
मृत्यू तारीख | मार्च १७, इ.स. १९९३ Nyack |
मृत्युचे कारण |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
व्यवसाय |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
भावंडे |
|
वैवाहिक जोडीदार |
|
पुरस्कार |
|
अधिकृत संकेतस्थळ | |
१९८४ पासून वॉशिंग्टन डीसी मधील व्यावसायिक नाटकांमधील उत्कृष्टतेला मान्यता देणारे वार्षिक हेलन हेस पुरस्कार हे तिच्या नावावर आहे. १९५५ मध्ये, न्यू यॉर्क शहरातील थिएटर डिस्ट्रिक्टमधील ४६ व्या स्ट्रीटवरील पूर्वीच्या फुल्टन थिएटरचे हेलन हेस थिएटर असे नामकरण करण्यात आले. १९८२ मध्ये जेव्हा ते ठिकाण पाडण्यात आले तेव्हा तिच्या सन्मानार्थ जवळच्या लिटल थिएटरचे नामकरण करण्यात आले. हेलन हेस यांना २० व्या शतकातील नाटकातल्या महान आघाडीच्या महिलांपैकी एक मानली जाते.[२]
कारकीर्द
संपादनहेसने वॉशिंग्टनच्या बेलास्को थिएटरमध्ये पाच वर्षांच्या असतान गायकाच्या रूपात रंगमंचावर कारकीर्द सुरू केली.[३] वयाच्या १० व्या वर्षी तिने जीन अँड द कॅलिको डॉल (१९१०) हा लघुपट बनवला होता. द सिन ऑफ मॅडेलॉन क्लॉडेट (१९३१) हा तिचा ध्वनी चित्रपटातील पदार्पण होता, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने ॲरोस्मिथ (१९३१) ए फेअरवेल टू आर्म्स (१९३२); व्हाईट सिस्टर (१९३३), व्हेनेसा: हर लव्ह स्टोरी (१९३५) मध्ये मुख्य भूमिका केल्या. हेस अखेरीस १९३५ मध्ये ब्रॉडवेला परतली, जिथे तीन वर्षे तिने गिल्बर्ट मिलरच्या व्हिक्टोरिया रेजिनाच्या निर्मितीमध्ये राणी व्हिक्टोरियाची मुख्य भूमिका केली.
हेस अनेक कारणे आणि संस्थांना वेळ आणि पैसा देण्यासाठी उदार दाता होती. न्यू यॉर्कच्या वेस्ट हॅव्हरस्ट्रॉ येथे स्थित हेलन हेस हॉस्पिटल या पुनर्वसन हॉस्पिटलमध्ये तिच्या परोपकारी कार्याचा सर्वात जास्त अभिमान हेसला वाटत असे. १९४० च्या दशकात हेस हॉस्पिटलमध्ये सामील झाली आणि १९४४ मध्ये बोर्ड ऑफ व्हिजिटर्समध्ये त्यांचे नाव देण्यात आले. १९७४ मध्ये, हॉस्पिटलचे नाव तिच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले. १९९३ मधील तिचा मृत्यू होईपर्यंत तिने ४९ वर्षे तिने हेलन हेस हॉस्पिटलला सेवा दिली. त्या काळात, तिने हॉस्पिटलसाठी अथकपणे वकिली केली आणि १९६० च्या दशकात अल्बानी येथे स्थलांतरित होऊ नये यासाठी त्यांनी यशस्वीपणे लढा दिला. १९७० च्या दशकात, हॉस्पिटलला अत्याधुनिक सुविधेत रूपांतरित करण्यासाठी निधीसाठी लॉबिंग करण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[४]
वैयक्तिक जीवन
संपादनहेस ही कॅथोलिक होती[५] [६] आणि रिपब्लिकन होती जिने अनेक रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनांना हजेरी लावली होती.[७]
हेसचे १७ मार्च १९९३ रोजी न्याक, न्यू यॉर्क येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हेसची मैत्रीण लिलियन गिश, "अमेरिकन सिनेमाची फर्स्ट लेडी", तिच्या इस्टेटची नियुक्त लाभार्थी होती, परंतु गिशचा मृत्यू केवळ १८ दिवसांपूर्वी झाला होता. हेसचे न्याक येथील ओक हिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.[८] तिच्या पश्चात तिचा मुलगा, जेम्स गॉर्डन मॅकआर्थर आणि चार नातवंडे होती.[९] २०११ मध्ये तिला यूएस टपाल तिकीट देऊन सन्मानित करण्यात आले.[१०]
संदर्भ
संपादन- ^ Reagan, Ronald."Ronald Reagan: Remarks at the Presentation Ceremony for the Presidential Medal of Freedom – May 12, 1986" presidency.ucsb.edu, May 12, 1986, accessed August 27, 2011
- ^ "Helen Hayes: A Remembrance – Washington Theatre Guide – TheatreWashington – Helen Hayes Awards". August 2, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 22, 2016 रोजी पाहिले.
- ^ Evely, Douglas E., Dickson, Paul, and Ackerman, S.J."The White House Neighborhood" On This Spot: Pinpointing the Past in Washington D.C. (2008), Capital Books, आयएसबीएन 1-933102-70-5, p. 166
- ^ "Pretty Penny to host Helen Hayes Hospital fundraiser – Lohud Rockland Blog". March 22, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 21, 2017 रोजी पाहिले.
- ^ Hayes, Helen. My Life in Three Acts. Harcourt Brace Jovanovich: San Diego, CA, 1990, p. unknown
- ^ Hevesi, Dennis. "Helen Hayes Is Remembered in Church She Loved", The New York Times, March 21, 1993, p. 45
- ^ Saker, Anne (August 18, 1988). "Taking the time for a foregone conclusion – UPI Archives". United Press International (इंग्रजी भाषेत). April 28, 2023 रोजी पाहिले.
- ^ Pace, Eric."Helen Hayes, Flower of the Stage, Dies at 92". The New York Times (requires registration), March 18, 1993
- ^ Jones, Kenneth (October 28, 2010). "Actor James MacArthur, Son of American Theatre Royalty, Dies at Age 72". Playbill (इंग्रजी भाषेत). September 29, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Helen Hayes Postage Stamp" Archived 2011-06-11 at the Wayback Machine. beyondtheperf.com, April 25, 2011, accessed August 27, 2011