हिंमतलाल मगनलाल शाह
हिंमतलाल मगनलाल शाह (१५ ऑगस्ट, इ.स. १९०७ - इ.स. १९८२:संगमनेर) हे संगमनेर येथील वकील, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. ते शिक्षण प्रसारक संस्थेचे एक प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष होते. हे संगमनेरचे नगराध्यक्ष होते तसेच तेथील श्वेतांबर जैन मंदिराचे ते विश्वस्त होते. संगमनेर महाविद्यालय नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी १९३८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [१]
व्यवसाय हे उपजीविकेचे साधन असतेच पण ते त्याहून अधिक समाजसेवेचे प्रभावी साधन असते, तसेच व्यवसायाला सामाजिक बांधिलकी असलीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. [१]. त्यामुळे व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय कार्याशी संपर्क ठेवला. वकीलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. नवोदित वकिलांना योग्य मार्गदर्शन, गरजू गरीबांना मोफत कायदेविषयक सल्ला, शैक्षणिक मदत त्यांनी केली.
संगमनेर महाविद्यालयाच्या रूपाने त्यांनी अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर-अकोले तालुक्यात महत्त्वाचे शैक्षणिक कार्य केले. शिक्षण प्रसारक संस्थेची प्रगती हे त्यांचे ध्येय होते. या महाविद्यालयाच्या द्वारा शहराच्या वैभवात भर पडावी, परिसराचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास व्हावा ही त्यांची तळमळ होती. [१]
१९ जून, इ.स. १९६१ रोजी महाविद्यालय सुरू करताना सरस्वती पूजन समारंभाचे अध्यक्ष या नात्याने ते उपस्थित विद्यार्थिवर्ग व नागरिक यांना म्हणाले, "तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही हे सारे करीत आहोत. आपल्या दिव्य यशाने तुम्ही आपल्या कुटुंबाला, संस्थेला, शहराला व राष्ट्राला ललामभूत ठराल, असा आमचा विश्वास आहे. ज्ञानाची गंगोत्री तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनतेने केले. त्याचा विपुल फायदा घ्या"[२][३]
शिक्षण
संपादनशाह यांचे शालेय शिक्षण संगमनेर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नासिक, बडोदे व पुणे येथे झाले. पुण्याच्या विधी महाविद्यालयातून ते एल. एल. बी. झाले.
- बी. ए. : ?
- एल. एल. बी. : १९३२ - विधि महाविद्यालय, पुणे
सामाजिक कारकीर्द
संपादन- नगराध्यक्ष : ??
- कायदेशीर सल्लागार संगमनेर नगरपालिकां : १९४०...
- कायदेशीर सल्लागार संगमनेर सहकारी साखर कारखाना, संगमनेर : १९६८ पासून ... :
- चेरमन, अहमदनगर जिल्हा अर्बन बँक : ??
- विश्वस्त : श्वेतांबर जैन मंदिर
- संगमनेरतर्फे कुंभोज तीर्थ प्रतिनिधी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b c "दर्शन" ग्रंथ, पान ११७, संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिन्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा. ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय् ज ॲडव्हरटायझिंग, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
- ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान ०५
- ^ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF#.E0.A4.AE.E0.A4.B9.E0.A4.BE.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.A6.E0.A5.8D.E0.A4.AF.E0.A4.BE.E0.A4.B2.E0.A4.AF.E0.A4.BE.E0.A4.9A.E0.A5.80_.E0.A4.B8.E0.A5.81.E0.A4.B0.E0.A5.81.E0.A4.B5.E0.A4.BE.E0.A4.A4