हा नदी (कोरिया)
हा नदी किंवा हांगांग (कोरियन उच्चार: [ha (ː) n.ɡaŋ]) ही दक्षिण कोरियामधील एक प्रमुख नदी असून कोरियन द्वीपावरील अम्नोन, तुमान व नाकडोंग यांच्यानंतर ४९४ कि.मी. लांबी असणारी चौथी सर्वात लांब नदी आहे. पूर्व दिशेला असणाऱ्या पर्वत रांगांमधील दोन लहान नद्यांपासून ती तयार होते. या दोन नद्या देशाची राजधानी सेऊलजवळ एकत्र येतात.[ संदर्भ हवा ]
दक्षिण कोरियातील एक प्रमुख नदी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | ग्याँगी प्रांत, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया | ||
लांबी |
| ||
नदीचे मुख | |||
पाणलोट क्षेत्रामधील देश | |||
Tributary |
| ||
| |||
भौगोलिक स्थान
संपादनकोरियन इतिहासात हा नदी आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरियाच्या तीन राजांनी या भूभागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळी नदीचा वापर पीत समुद्रमार्गे चीनशी व्यापार करण्यासाठी जलमार्ग म्हणून केला जात होता. परंतु या नदीचे समुद्राला मिळणारे मुख व खाडी ही दोन दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया या देशांच्या सीमेवर असल्याने सध्या ही नदी दळणवळणासाठी वापरली जात नाही. तसेच येथे नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध केला आहे. १२ दशलक्ष लोकसंख्या या नदीतील पाण्याचा वापर करते.[१]
प्रदूषण आणि पुनरुज्जीवन
संपादन१९५० च्या दशकात कोरिया देशात मोठ्या प्रमाणावर उद्योग व मानवी वस्ती यांची वाढ झाली. या काळात नदीचा वापर केवळ सांडपाणी, मैला, टाकावू रसायने इ. वाहून नेण्यासाठी केला गेला. परंतु हा एक पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असल्याने १९८० च्या दशकात सरकार व नागरिक यांच्या भूमिकेत बदल झाला. सेऊल मधील १९८८ उन्हाळी ऑलीम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने नदी स्वच्छता अभियान वेगाने राबविण्यात आले.[२] एका दशकात नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय फरक पडला. हान नदीच्या खालच्या काठावर पादचारी मार्ग, सायकल मार्ग, सार्वजनिक उद्याने आणि रेस्टॉरंट्स उभारली गेली आहेत. २०११ सालच्या सर्वेक्षणानुसार ५१.३ टक्के नागरिक आणि ६८.९ टक्के तज्ज्ञांनी सेऊल शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक ठिकाण म्हणून पर्यटनाला पसंती दिली आहे.[३]
पर्यावरण लढा
संपादनसन २००० च्या जुलै महिन्यात अमेरिकन सैन्याने सेऊलमधील त्यांच्या एका तळावरून २० गॅलन (७५.७ लीटर) अत्यंत विषारी रसायन नदीत सोडले. जागृत नागरिकांनी लगेच याची गंभीर दखल घेऊन निषेध मोहिमेची सुरुवात केली आणि दक्षिण कोरियाच्या पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या अमेरिकेच्या लष्कराला या कृतीची कबुली देण्यास भाग पाडले. नदीच्या पाण्याने भरलेली खेळण्यातील रॉकेटस अमेरिकी सैन्यतळावर सोडली गेली. ग्रीन पार्टी कोरियाने यापूर्वीही अशीच ६० गॅलन विषारी रसायने या तळावरून सोडल्याचा आरोप केला होता. जर लोक दीर्घकाळपर्यंत या रसायनांच्या संपर्कात आले तर फुफ्फुसांचे कर्करोग होऊ शकतात आणि पाण्यामध्ये मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू होतो हे सिद्ध केले गेले. या सर्व प्रकाराविषयी अमेरिकेने कोरियन जनतेची माफी मागितली.[४] या चळवळीने बोंग जोन-हो यांचा २००६ सालातील प्रख्यात चित्रपट द होस्टच्या निर्मितीसाठी प्रेरणा दिली.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Longest Rivers In South Korea". worldatlas.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Cleanup Makes It a Source of National Pride : Seoul's Once-Dead Han River Brought Back to Life". latimes.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "South Korea's polluted river basin". sciencedaily.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "U.S. Apologizes for Dumping Chemical". latimes.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Korean filmmakers take center stage to bash trade talks". bilaterals.org. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.