हातखंबा
हातखंबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
?हातखंबा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रत्नागिरी |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे गाव मुंबई गोवा महामार्गावर असल्यामुळे गाव कायम चर्चे मध्ये असते.या गावचा शिमगोत्सव हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा शिमगोत्सव मानला जातो.साधे लोकजीवन आहे इथले. रत्नागिरी शहर गावापासून जवळ आहे त्यामुळे गाव विकसित आहे.गावात सुशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे. गावात अनेक राजकिय नेते, व्यावसायिक, समाजसेवक, उच्चतम सरकारी नोकरदार यांचा समावेश आहे. गावात कोणत्याच प्रकारची जातीयता नाहीये. सर्व सण गाव एकत्र साजरा केला जातो.
प्रेक्षणीय स्थळे
संपादन1.गावदेवी आई वाघजाई मंदिर. 2.हातखंबा गावातील शिमगा. 3.जुई. 4.आई वाघजाई मंदिर तारवेवाडी. 5. भगवती मंदिर, भुतेवाडी. 6. महापुरुष मंदिर कदमवाडी. 7. पानवल धरण. 8. गावातील मंदिरे.
नागरी सुविधा
संपादनसुसज्ज ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय, तसेच गावत STATE BANK OF INDIA आहे. पोस्ट ऑफिस ची देखील सुविधा आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जिल्हा परिषद शाळा आहेत. तसेच माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे. गावात सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे वेगवेगळे उपक्रम गावात राबविले जातात.
जवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/