हरिहर श्रीपाद नातू ( अज्ञात -हयात) हे मराठी कीर्तनकार आहेत. ते कीर्तनाच्या पद्धतींतील नारदीय पद्धतीनुसार कीर्तन करतात.[ दुजोरा हवा]

भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी असताना नातूंना त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे महाराष्ट्र शासनाचा १९९६ सालचा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते मिळालेला आहे. [ संदर्भ हवा ]

कीर्तन कारकीर्द

संपादन

त्यांना कीर्तन करण्याचा इ.स. १९७७पासूनचा अनुभव आहे. शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर, नृसिंहवाडी, माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग इत्यादी महाराष्ट्रभरातील ठिकाणांतील देवस्थानांमध्ये त्यांची कीर्तने झाली आहेत. आकाशवाणीदूरदर्शनवरील (ज्ञानदीप) या माध्यमांतूनही त्यांनी कीर्तन केले आहे. [ दुजोरा हवा]

’कीर्तनी गाऊ अनंत’ व ’कीर्तनी गाऊ गणेशू’ या दोन ध्वनिफिती (audio cassettes) तसेच नागपूरकुडाळ महोत्सवाच्या व्हिडीओ कॅसेट्स वितरित झाल्या आहेत. याचबरोबर गोव्यातील हरिभक्त परिषदेचे १५वे कीर्तन संमेलन आणि कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव या दोन्हींची संकल्पना नातूंची होती. या कार्यक्रमांचे नेटके आयोजन नातूंनी केले होते.

भारतीय स्टेट बँकेतील नोकरी आणि कीर्तनकारिता या दोन्ही क्षेत्रांत झोकून देणाऱ्या नातूंनी अभिनय आणि निवेदन या कलांचीही जोपासना केलेली आहे. कुडाळमधील बाबा वर्दम थिएटर्स या कोकणातील सुप्रसिद्ध हौशी नाट्य चळवळीमधे त्यांचे योगदान आहे. त्यांनी लिहिलेल्या राज्य पुरस्कारप्राप्त ’गीत श्री साई- कथामृत’ या संगीत नाटकात ते स्वतः निवेदक होते. हरिहर नातू हे कोकणातील नावाजलेल्या ’नादब्रह्म’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.