हरिलाल मोहनदास गांधी
हरिलाल मोहनदास गांधी, (इ.स. १८८८- १८ जून, इ.स. १९४८) हे महात्मा गांधी ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. हरिलाल व त्यांच्या वडिलांशी असलेले त्यांचे मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहेत.
पार्श्वभूमीसंपादन करा
पाश्चिमात्य शिक्षणाविरुद्ध बंड म्हणून महात्मा गांधी यांनी हरिलाल यांना कायद्याचे शिक्षण घेऊ दिले नाही. [१] आणि हेच हरिलाल यांना मनाला लागून ते बंडखोर झाले. हरिलाल यांनी इस्लाम धर्म स्वीकारला व आपले नाव अब्दुल्ला गांधी ठेवले. मात्र, नंतरच्या काळात ते परत हिंदू झाले.
सुरुवातीचे आयुष्यसंपादन करा
सुरुवातीच्या काळात हरिलाल यांनी आपल्या पित्यास ते ब्रिटिश सरकारविरुद्ध करीत असलेल्या चळवळींसाठी मदत केली. त्यांना उच्च शिक्षण घेऊन आपल्या वडिलांसारखे बॅरिस्टर व्हायचे होते. परंतु अभ्यासात हुशार नसल्याने ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. प्रदीर्घ आजाराने त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले.
शेवटची वर्षेसंपादन करा
आयुष्यात निराश होऊन हरिलाल अतिशय मद्यपान करू लागले. १८ जून, १९४८ साली हृदयविकाराने त्यांचे मुंबईत निधन झाले.
चित्रपट व नाटकसंपादन करा
३ ऑगस्ट २००७ रोजी अनिल कपूर निर्मित व फिरोज अब्बास खान दिग्दर्शित गांधी, माय फादर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
याच कथेवर आधारलेले फिरोज खान यांनी महात्मा विरुद्ध गांधी (महात्मा व्हर्सस गांधी) हे नाटकही दिग्दर्शित केले आहे.
मराठीत गांधी विरुद्ध गांधी या नावाचे नाटक अजित दळवी यांनी लिहिले आहे. ते मराठी रंगभूमीवर अतिशय गाजले.