आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारे महत्त्वपूर्ण साधन म्हणून अधिकोषणाकडे पहिले जाते. अधिकोषण क्षेत्र शाश्वत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार गुंतवणूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अधिकोष स्वतः प्रदूषण करणार नाहीत. पण प्रदूषण करणाऱ्या उद्योगांशी अधिकोषाचा संबंध असू शकतो.  हरित बँकिंग मध्ये बँकांनी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कर्ज देण्याचे टाळणे अपेक्षित असते.

पर्यावरण पूरक उद्योगांना किंवा प्रकल्पांना बँकाकडून होणारा वित्तपुरवठा म्हणजे हरित अधिकोषण होय. ही अशा प्रकारची व्यवस्था असते की, ज्याद्वारे उद्योगांना हरित होण्यासाठी मदत केली जाते. नैसर्गिक पर्यावरणाची प्रक्रिया कायम राखली जाते. हरित अधोकोषण हे बँका, उद्योग आणि संपूर्ण अर्थव्यवस्था यांच्या परस्पर हिताची आहे. हरित अधिकोषणामुळे उद्योग हरित होण्याबरोबरच बंकाकडील भविष्यकालीन मात्तेची गुणवत्ताही वाढेल.

हरित अधिकोषणाचे महत्त्व

१. पर्यावरणाचा संदर्भ: उद्योगांचा पर्यावरणाशी असणारा संबंध बँकाच्या दृष्टीनेही जोखीम निर्माण करू शकतो. हरित अधिकोषणामुळे पर्यावरणाचा अधिक गांभीर्याने विचार केला जात आहे.

२. पर्यावरण अटींचे पालन: पर्यावरणीय शिस्तीच्या पालनासाठी सक्षम अधिकाऱ्याकडून उद्योगासंदर्भात विशिष्ट मानके ठरविली जाऊ शकतात. याचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कारवाईची तरतूद केल्यास पर्यावरणाची हानी थांबण्यास मदत होते.

३. पर्यावरणाचे रक्षण: पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या उद्योगांना बँकांनी कर्जपुरवठा केल्यास होणाऱ्या पर्यावरण प्रदूषणास बँकांना जबाबदार धरले जाते. प्रदूषण निराकरणाचा खर्च उद्योग व अधिकोष या दोहोंकडून वसूल केला जातो. यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते.

४. सामाजिक बांधिलकी: अधिकोषाचे भागधारक, ठेवीदार व इतर ग्राहकांना पर्यावरण रक्षणाचा लाभ होतो. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अधिकोषांची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.

संदर्भ

संपादन

 बी. एच. दामजी, आधुनिक बँकिंग, (मराठी) विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद, जुलै, २०१६, आय. एस. बी. एन. ९७८-९३-८१३७४-६९-६