हणमंतराव रामदास गायकवाड

हणमंतराव रामदास गायकवाड उर्फ एचआर गायकवाड (जन्म: २१ ऑक्टोबर १९७२) हे एक भारतीय उद्योजक आणि भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा कंपनी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. [१] [२]

हणमंतराव रामदास गायकवाड
हणमंतराव रामदास गायकवाड
जन्म २१ ऑक्टोबर १९७२
रहिमतपूर, सातारा
संकेतस्थळ
http://bvgindia.in/


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.=संपादन करा

गायकवाड यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी झाला. ते सहावीत असताना त्याचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. त्यावेळी ते कुटुंबासमवेत एका लहानश्या खोलीत रहायचे. [३] अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी दहावीमध्ये ८८% प्राप्त केले आणि शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली. ते डिप्लोमाच्या दुस-या वर्षात शिकत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे पितृछत्र हरपले. तरीही त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला, [४] इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरु असताना त्यांनी शिकवण्या घेणे, घरांना रंग देणे अशी छोटी-मोठी कामे करत स्वत:चा निर्वाह केला. [५]

१९९४ मध्ये ते टेल्कोमध्ये (सध्याची टाटा मोटर्स) पुणे प्रकल्पासाठी पदवीधर शिकाऊ अभियंता म्हणून रूजू झाले.[६]

करिअरसंपादन करा

व्हीआयटीमध्ये शिकत असताना स्वामी विवेकानंदांच्या विचाराने गायकवाड प्रभावित झाले. यातूनच त्यांना भारत विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.[३] या प्रतिष्ठानमागे दानशूरांकडून निधी घेऊन गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची संकल्पना होती. त्यानंतर अल्पावधीतच प्रतिष्ठान लवकरच कुशल व अकुशल कामगार क्षेत्रात रोजगाराच्या संधींमध्ये विस्तारले. [६]

टाटा मोटर्समध्ये काम करत असताना, [७] 1997 मध्ये गायकवाड यांनी निरुपयोगी म्हणून भंगारमध्ये टाकून दिलेल्या केबल्सचा सदुपयोग करून कंपनीचा मोठा खर्च वाचवला. त्यांच्या या कार्यासाठी कंपनीने त्यांचे कौतुक केले.[८] यामुळे गायकवाड कामगारांमध्ये परिचित झाले आणि त्यांच्या गावातील तरुणांनी नोकरीसाठी त्यांच्याकडे संपर्क साधायला सुरुवात केली. या संधीचा लाभ घेत त्यांनी व्यवस्थापनाकडे या तरुणांसाठी काहीतरी नोकरी देण्याची विनंती केली. या तरुणांपैकी आठ जणांना नोकरी देण्याचे प्रकल्प व्यवस्थापनाने मान्य केले. मात्र या तरुणांना कंपनीच्या पटावर नोकरी दिली गेली नाही. गायकवाड यांनी सुचवले की आपल्याकडे नोंदवलेल्या प्रतिष्ठानवर लोकांना रोजगार देता येईल. त्यासाठी टाटा मोटर्सने या प्रतिष्ठानला निधी पुरवावा. त्यांचा आत्मविश्वास पाहता टाटा मोटर्सने केवळ त्यांची सूचनाच स्वीकारली नाही तर त्यांना टाटा फायनान्सकडून साफसफाईची उपकरणे खरेदी करण्यासाठी 60 लाखांचे कर्जही दिले. [६] गायकवाड यांनी २००० साली टाटा मोटर्सचा औपचारिक राजीनामा दिला आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि रोजगारावर सामाजिक दृष्टिकोनातून काम सुरु केले. त्यानंतर या प्रतिष्ठानला भारत विकास समूह (BVG) असे नाव देण्याचा निर्णय घेतला.[९]

भारत विकास समूह अल्पावधीतच भारत सरकारच्या सहकार्याने एकात्मिक सुविधा व्यवस्थापन कार्ये आणि कौशल्य विकासाच्या विस्तारित सेवा कार्यात अग्रेसर बनला. [६] भारत विकास समूह अनेक शासकीय संस्थांना दर्जेदार सेवा प्रदान करतो. त्यापैकी प्रमुख म्हणजे भारताचे प्रधानमंत्री यांचे कार्यालय आणि भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेले राष्ट्रपती भवन हे होय. [१०] समूहाचे २०१२ पर्यंतचे मूल्य १,००० कोटी आहे [४] कंपनी यांत्रिकीकृत घरगुती देखभाल, रुग्णालय देखभाल, [१०] लँडस्केपींग आणि बागकाम, रसद, वाहतूक, [११] नागरी व विद्युत कार्य, रुग्णवाहिका सेवा, [१२] औद्योगिक [१३] आणि नागरी कचरा व्यवस्थापन इ. सेवा खाजगी आणि सरकारी संस्थांना पुरविते. [१४] [१५] कंपनी आपले कार्य परदेशांमध्येही देखील विस्तारित करीत आहे. [१६]

पुरस्कारसंपादन करा

गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक आणि उद्योजकीय कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत.

वैयक्तिक जीवनसंपादन करा

गायकवाड हे पत्नी आणि दोन मुलींसह पुण्यात राहतात. त्यांना ध्यानाची आवड आहे.[१६]

संदर्भसंपादन करा

 1. ^ Express, Indian. http://indianexpress.com/article/cities/mumbai/dial-108-one-of-161-ambulances-promises-to-reach-you-in-20-mins/. Missing or empty |title= (सहाय्य)
 2. ^ http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Round-the-clock-ambulance-service-to-roll-out-on-R-Day/articleshow/29331843.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
 3. a b http://articles.economictimes.indiatimes.com/2008-11-17/news/27731323_1_tata-motors-satara-indica. Missing or empty |title= (सहाय्य)
 4. a b Tare, Kiran. http://indiatoday.intoday.in/story/rural-rockstars-hanmantrao-gaikwad-from-pune/1/216532.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 5. ^ Subramanian, Anusha. http://www.businesstoday.in/magazine/features/rural-liberator/story/4597.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 6. a b c d Srivastava, Samar. http://forbesindia.com/article/work-in-progress/bharat-vikas-groups-clean-sweep/24842/0. Missing or empty |title= (सहाय्य)
 7. ^ http://events.vccircle.com/content/hanmant-ramdas-gaikwad. Missing or empty |title= (सहाय्य)
 8. ^ http://forbesindia.com/printcontent/24842. Missing or empty |title= (सहाय्य)
 9. ^ Bharat Vikas Group set to rope in a global PE investor Business Standard, 22 December 2010
 10. a b http://www.mumbaimirror.com/mumbai/civic/You-can-be-this-Sion/articleshow/51449586.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
 11. ^ Balakrishnan, Reghu. http://www.livemint.com/Companies/MnF7h2g1sTH7eWY9Ao3nXP/3i-Group-to-sell-30-stake-in-BVG-India.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 12. ^ http://archivehealthcare.financialexpress.com/latest-updates/2508-maharashtra-govt-launches-emergency-medical-services-with-bvg. Missing or empty |title= (सहाय्य)
 13. ^ http://www.livemint.com/Money/5BB1cqRVF339mfcA9BGLkN/Facilities-management-is-the-next-big-thing-in-real-estate-s.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 14. ^ http://www.nuffoodsspectrum.in/inner_view_single_details.php?page=&content_type=panel&vrtcl_panel_nm=LATEST%20NEWS&ele_id=NOR_5395aae57a2d60.46833158. Missing or empty |title= (सहाय्य)
 15. ^ http://www.livemint.com/Companies/MnF7h2g1sTH7eWY9Ao3nXP/3i-Group-to-sell-30-stake-in-BVG-India.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 16. a b A Clean Sweep Pune Mirror, 31 August 2014