हंसा प्रफुल पारेख हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. "खिचडी" या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत सुप्रिया पाठक यांनी हंसाची भूमिका केली.[१] ही मालिका २००२ साली आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या पारेख या गुजराती कुटुंबाची कथा आहे.[२]

हंसा पारेख
खिचडी या मालिकेतील पात्र
Supriya Pathak in 2015.jpg
सुप्रिया पाठक यांची ही भूमिका प्रचंड गाजली
लेखक

आतीश कपाडिया
अभिनेता

सुप्रिया पाठक
माहिती
टोपणनाव
  • हंसिनी आणि इतर लाडिक नावे (प्रफुल द्वारे)
सहकारी प्रफुल पारेख
लिंग स्त्री
व्यवसाय आयुष्यात हिने कुठलेच काम केले नाही
कुटुंब पारेख परिवार
नातेवाईक
राष्ट्रीयत्व भारतीय
तळटिपा "खिचडी" या मालिकेतील पात्र

हंसा पारेखचे पात्र प्रचंड गाजले, इतके की सुप्रिया पाठक यांना "हंसा" म्हणूनच ओळखतात. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार मिळाले.[३][४][५]

प्रफुल हा हंसा पारेखचा नवरा आहे. या दोघांची जोडी प्रचंड गाजली. या दोघांचे संवाद मालिकेत खूप विनोद निर्माण करतात. आजही इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर ही जोडी लोकप्रिय आहे.[६][७]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "IMDB/hansa parekh".
  2. ^ "IMDB/khichadi".
  3. ^ "GR8! TV Magazine - THE INDIAN TELEVISION ACADEMY AWARDS, 2004". www.gr8mag.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
  4. ^ "TellyAwards".
  5. ^ "GR8! TV Magazine - THE INDIAN TELEVISION ACADEMY AWARDS, 2004". www.gr8mag.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
  6. ^ "Praful, Corona matlab? As her show Khichdi makes a comeback amid lockdown, Supriya Pathak feels not everything's lost". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-09. 2022-02-01 रोजी पाहिले.
  7. ^ "Debina Bonnerjee shares a hilarious throwback video from Khichdi with Praful Parekh & it will crack you up | PINKVILLA". www.pinkvilla.com. 2022-02-01 रोजी पाहिले.