प्रफुल तुलसीदास पारेख हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. "खिचडी" या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत राजीव मेहता यांनी प्रफुलची भूमिका केली. ही मालिका २००२ साली आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या पारेख या गुजराती कुटुंबाची कथा आहे.[१][२]

प्रफुल पारेख
खिचडी या मालिकेतील पात्र
लेखक

आतीश कपाडिया
अभिनेता

राजीव मेहता
माहिती
टोपणनाव
  • प्रफुल (हंसा द्वारे)
  • गधा (तुलसीदास द्वारे)
सहकारी हंसा पारेख
लिंग पुरुष
व्यवसाय सेल्समन (परंतु प्रत्येक ठिकाणी दुकानदार वैतागून प्रफुलला काढून टाकतात.)
कुटुंब पारेख परिवार
नातेवाईक
राष्ट्रीयत्व भारतीय
तळटिपा "खिचडी" या मालिकेतील पात्र

प्रफुल हा हंसा पारेखचा नवरा आहे. या दोघांची जोडी प्रचंड गाजली. या दोघांचे संवाद मालिकेत खूप विनोद निर्माण करतात. आजही इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर ही जोडी लोकप्रिय आहे.[३][४]

संदर्भ संपादन

  1. ^ "IMDB".
  2. ^ "A Look Back at the Original Cast Members of Khichdi and What They are Doing Now". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-05-26. 2022-02-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Praful, Corona matlab? As her show Khichdi makes a comeback amid lockdown, Supriya Pathak feels not everything's lost". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-09. 2022-02-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Debina Bonnerjee shares a hilarious throwback video from Khichdi with Praful Parekh & it will crack you up | PINKVILLA". www.pinkvilla.com. Archived from the original on 2022-02-01. 2022-02-01 रोजी पाहिले.