हंगा धरण
पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हंगा नावाचे एक धरण आहे. हे मातीचे धरण हंगा नदीवर असून जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे.धरणाची लांबी ४०० मीटर असून उंची १५ मीटर आहे.या दगड माती बांधकाम असलेल्या धरणाचे काम इ.स.१९७२ ते १९८० पर्यंत सुरू होते.याधरणाची निर्मिती सिंचनासाठी करण्यात आलेली असून यापासून हंगा मुंगशी वडनेर या गावाच्या हद्दीतील शेती सिंचनाकरीता एक कालवा खोदलेला आहे त्यामुळे सदर गावामधील शेती सिंचनाखाली आली आहे.त्यामुळे या गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.परंतु गेल्या काही दशकांपासून पारनेर व परीसरात खूप कमी पाऊस पडत असल्याने व धरणामध्ये पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाची अवस्था जायकवाडी धरणासारखी झालेली आहे.हंगा धरण प्रजिमा पासून १ किमी आहे. या धरणातून हंगा पारनेर शहर लोणी हवेली या गावच्या नळ पाणी पुरवठा योजना असून तलावात सतत कमी पाणीसाठा असल्याने या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे या योजना असलेल्या गावांनी टंचाई काळासाठी पर्यायी मुळा धरणातून तत्काळ पाणी पुरवठा योजना व टँकर सुरू केलेली अाहे.
हंगा धरण | |
अधिकृत नाव | हंगा धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
याच हंगा नदीवर ब्रिटिशांनी विसापूर तलाव बांधला आहे.