स्वान द्वीपसमूह (होन्डुरास)
(स्वान आयलंड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वान आयलंड्स, स्वान द्पीवसमूह, इस्लास सांतानिया तथा इस्लास देल सिस्ने हा होन्डुरास देशाच्या इस्लास देला बाहिया प्रांताचा एक भाग आहे. कॅरिबियन समुद्रातील तीन बेटांचा समावेश असलेला हा प्रदेश मुख्य भूमीपासून अंदाजे १५३ किमी उत्तरेस आहे. येथे होन्डुरासच्या आरमाराचा छोटा तळ आहे.
हा लेख होन्डुरासमधील द्वीपसमूह याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्वान आयलंड (निःसंदिग्धीकरण).
या द्वीपसमूहात ग्रेट स्वान आयलंड, लिटल स्वान आणि बूबी के ही तीन बेटे आहेत. येथून १३० ते १५० किमी उत्तरेस रोझारियो बँक आणि मिस्तेरियोसा बँक ही दोन प्रवाळबेटे आहेत. या प्रवाळबेटांच्या लगेच उत्तरेस केमन ट्रेंच ही १६,४०४ फूट खोलीची समुद्रातील दरी आहे.