भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

(स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक आगामी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.[]

भारताचा राष्ट्रध्वज
रवींद्रनाथ ठाकूर यांनी गायलेले राष्ट्रगीत

स्वरूप

संपादन
  • भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.[][]
  • औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील.[]
  • भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे, जी १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. या उत्सवांमध्ये प्रत्येक राज्यातील विविध शहरात विविध कार्यक्रम, उत्सव, विविध रॅली, सामुदायिक कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. ३१ जुलै २०२२ रोजी 'मन की बात' मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरमयान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केले आहे.[][][]

विविध उपक्रम

संपादन
 
२००७ साली लाल किल्ला येथील समारोह
  • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीप्र गीत गायन, युवकांसाठी 'बढे चलो' अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी घेतली जात आहे.[][]
  • धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला आहे.[१०][११]
  • मोठी शहरे तसेच लहान गावांमध्ये रोषणाई, आतषबाजी, वैचारिक व्याख्याने, स्पर्धा, ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.[१२]
  • स्वातंत्र्यलढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, अभिलेखागार यांनीही प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे.[१३]

हर घर तिरंगा अभियान

संपादन
 
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महौत्सवानिमित्त सजविलेला पुणे येथील शनिवारवाडा

भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.[१४]

भारताबाहेर

संपादन

भारत देशाच्या बाहेर असलेल्या विविध देशातील भारतीय दूतावास तसेच भारतीय नागरिक यांनी या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, चित्र प्रदर्शन अशा विविध माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे.[१५]

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन". www.timesnowmarathi.com. 2022-08-07. 2022-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-12 रोजी पाहिले.
  2. ^ "75 weeks ahead of 75th Independence Day, PM Modi launches Amrit Mahotsav: Highlights". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०२१. १२ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Ministry of Culture to celebrate one year of Azadi Ka Amrit Mahotsav". pib.gov.in. १० ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Health care may feature in PM Narendra Modi's Independence Day speech". www.business-standard.com (इंग्रजी भाषेत). ७ ऑगस्ट २०२२. १० ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "Flag Video Profile Generator". ७ जानेवारी १९८०. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  6. ^ Singh., Jodha, Vijay S. Jodha, Samar. Tiranga : a celebration of the Indian flag. Neovision Publishers for Yuva Hindustani, Flag Foundation of India. ISBN 81-88249-01-7. OCLC 62327150.
  7. ^ "PM Modi changes display picture of his social media accounts to 'Tricolour', urges people to do same". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. २ ऑगस्ट २०२२. ISSN 0971-751X. १० ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  8. ^ "आजादी का अमृत महोत्सव : 'बढ़े चलो' का भव्य समापन दिल्ली में शुक्रवार को होगा". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-08-12 रोजी पाहिले.
  9. ^ "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मंगळवारी तब्बल २.५० लाख विद्यार्थी गाणार सामूहिक राष्ट्रगीत". लोकमत. 2022-08-07. 2022-08-12 रोजी पाहिले.
  10. ^ "पंंढरपुर विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात स्वातंंत्र्यदिना निमित्त तिरंगी फुलांची आरास, पहा फोटो". LatestLY मराठी. 2020-08-15. 2022-08-13 रोजी पाहिले.
  11. ^ "भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन; इंदूरमध्ये 19 दिवस आधीच साजरा झाला स्वातंत्र्य दिन". टीव्ही९ मराठी. 2022-07-27. 2022-08-13 रोजी पाहिले.
  12. ^ "संक्षिप्त". सकाळ. 2022-08-13 रोजी पाहिले.
  13. ^ "आजादी का अमृत महोत्सव: दिल्ली में सजेगी गुमनाम वीरों की कहानी, स्वतंत्रता संग्राम के दुर्लभ दस्तावेज भी देख पाएंगे". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-08-13 रोजी पाहिले.
  14. ^ "देश में 'हर घर तिरंगा' अभियान की धूम, तस्वीरों में देखें राष्ट्र ध्वज के प्रति लोगों का जोश और उत्साह". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2022-08-11. 2022-08-12 रोजी पाहिले.
  15. ^ "Indian Consulate in New York, IAAC to host Azadi ka Amrit Mahotsav". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2022-08-09.

बाह्य दुवे

संपादन