भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भुगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. त्या कोशांनाच "स्थल कोश" असे म्हणतात. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद ' स्थानपोथी ' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थल कोशाची रचना केली.या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पनिणीचेव्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र,बौद्ध व जैन साहित्य,चिनी - फारशी - ग्रीक यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो, स्थल कोश इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

संदर्भ संपादन

[१] [२]

  1. ^ Site Dictionary of india
  2. ^ History of the site cell in India