स्क्वेअर किलोमीटर ॲरे
स्क्वेअर किलोमीटर ॲरे (Square Kilometre Array; SKA; एसकेए किंवा स्का) हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये बनवण्यात येणारा अनेक रेडिओ दुर्बिणींचा एक भव्य प्रकल्प आहे जर पूर्ण झाला तर त्याचे संकलन क्षेत्रफळ एक वर्ग किलोमीटर असेल.[१][२] हा प्रकल्प रेडिओ वर्णपटातील विस्तृत वारंवारतांवर काम करेल आणि त्याच्या आकारामुळे तो इतर कोणत्याही रेडिओ दुर्बिणीपेक्षा ५० पट जास्त संवेदनशील असेल. यासाठी अतिशय उच्च क्षमतेचे केंद्रीय संगणक आणि सध्याच्या जागतिक इंटरनेट वाहतुकीपेक्षा जास्त क्षमतेचे लांब पल्ल्याचे दुवे लागतील.[३] त्यामुळे कधीही नव्हे इतक्या दहा हजार पटापेक्षा जास्त वेगाने आकाशाचे सर्वेक्षण करता येईल.
स्क्वेअर किलोमीटर ॲरे | |
संस्था | एसकेए संघटना |
---|---|
स्थळ | दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया |
तरंगलांबी | रेडिओ तरंग ५० मेगाहर्ट्झ ते १४ गिगाहर्ट्झ |
स्थापना | बांधणीस सुरुवात २०१८ |
संग्रहण क्षेत्रफळ | १ किमी२ |
संकेतस्थळ | www.tips4uhindi.tk |
या टेलिस्कोपची ग्रहण केंद्रे केंद्रीय कोरपासून कमीत कमी ३००० किमी (१९०० मैल) अंतरावर असल्यामुळे त्यांपासून खगोलांची सर्वात जास्त विभेदन असलेली छायाचित्रे मिळतील. एसकेए दक्षिण गोलार्धातील उप-सहारा राज्यांमध्ये बनवले जाईल व त्याचे केंद्रीय कोर रेडिओ गोंगाट कमी असलेल्या आणि आपल्या आकाशगंगेचे सर्वोत्तम दृश्य दिसणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असेल.[४]
एसकेएच्या नियोजित योजनेनुसार त्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि सुरुवातीची निरीक्षणे २०२० साली घेण्यातयेतील. एसकेएचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाईल. पहिला टप्पा (२०१८-२०२३) दुर्बिणीच्या एकूण क्षमतेच्या १०% असेल.[५][६] एसकेएच्या पहिल्या टप्प्याचा खर्च ६५ कोटी युरो आहे. दुसऱ्या टप्प्याचा खर्च अद्याप काढण्यात आलेला नाही.[७] या प्रकल्पाचे मुख्यालय युनायटेड किंग्डमच्या जॉड्रेल बँक वेधशाळा येथे आहे.[८][९]
संघटना
संपादनएसकेए या जागतिक प्रकल्पामध्ये दहा देश सहभागी आहेत. या प्रकल्पाचे उद्दिष्ट विश्वाची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दलच्या प्रमुख प्रश्नांचा वेध घेणे हा आहे.[१०]
नोव्हेंबर २०११ मध्ये एसकेए संघटनेची स्थापना केरण्यात आली आणि प्रकल्प केवळ एक सहकार्यामधून एक स्वतंत्र विना-नफा कंपनीमध्ये बदलला.[११] एप्रिल २०१६ पर्यंत एसकेए संघटनेचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत:[११][१२][१३]
- ऑस्ट्रेलिया : डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्री अँड सायन्स
- कॅनडा : नॅशनल रिसर्च काऊन्सिल
- चीन : नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरिज ऑफ द चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस
- भारत : नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स[१४][१५]
- इटली : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रोफिजिक्स
- न्यू झीलँड : मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट
- दक्षिण आफ्रिका : नॅशनल रिसर्च फाऊंडेशन
- स्वीडन: ओन्साला स्पेस ऑब्झर्व्हेटरी
- नेदरलँड्स : नेदरलँड्स ऑर्गनयझेशन फॉर सायंटिफिक रिसर्च
- युनायटेड किंग्डम : सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅसिलिटिज काऊन्सिल
- जर्मनी हा देशही या संघटनेचा सदस्य होता.[१६][१७] पण जून २०१५मध्ये जर्मनीने सदस्यत्व सोडले.[१८]
वर्णन
संपादनएसकेए हजारो किलोमीटर अंतरामध्ये पसरलेल्या हजारो अँटेनांनी ग्रहण केलेले संदेश एकत्रित करून छिद्र संष्लेशण (ॲपर्चर सिंथेसिस) या तंत्राच्या सहाय्याने एका भव्य रेडिओ दुर्बिणीची नक्कल करेल.[१९][२०]
एसकेए पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ५० मेगाहर्ट्झ ते १४ गिगाहर्ट्झ या वारंवारतांदरम्यान अखंड कव्हरेज देईल.
- पहिला टप्पा: २०२३ पर्यंत कमी आणि मध्य वारंवारतांमध्ये एकूण संकलन क्षेत्रफळाच्या १०% क्षेत्रफळ पुरवेल (एसकेए१).[२१]
- दुसरा टप्पा:२०३० पर्यंत कमी आणि मध्य वारंवारतांमध्ये संपूर्ण शृंखला तयार.[२२]
५० मेगाहर्ट्झ ते १४ मेगाहर्ट्झ एवढ्या विस्तृत वारंवारतांसाठी एकाच प्रकारच्या अँटेना वापरल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून एसकेए मध्ये एसकेए-कमी, एसकेए-मध्य आणि सर्व्हे शृंखलेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अँटेनांच्या उप-शृंखला असतील.
महत्त्वाचे प्रकल्प
संपादनएसकेएला खगोलभौतिकी, मूलभूत भौतिकशास्त्र, विश्वनिर्मितीशास्त्र आणि मूलकण भौतिकशास्त्रामधील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता असेल असे अभिकल्पित केले आहे. एसकेए साठी पुढील प्रमुख वैज्ञानिक विषय निवडण्यात आले आहेत
सामान्य सापेक्षतावादाच्या चाचण्या
संपादनदीर्घिका, विश्वनिर्मितीशास्त्र, कृष्णद्रव्य, कृष्णऊर्जा
संपादनपुनर्-आयनीकरणाचा काळ
संपादनवैश्विक चुंबकत्व
संपादनपृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Facts and figures" (इंग्रजी भाषेत). SKA Organisation. 2012-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 May 2012 रोजी पाहिले.
- ^ Spie (2014). "Philip Diamond plenary: The Square Kilometre Array: A Physics Machine for the 21st Century". SPIE Newsroom (इंग्रजी भाषेत). doi:10.1117/2.3201407.12.
- ^ [१] Archived 2016-08-17 at the Wayback Machine., The Square Kilometre Array, p.19
- ^ "Africa and Australasia to share Square Kilometre Array" (इंग्रजी भाषेत). BBC.
- ^ "The project timeline" (इंग्रजी भाषेत). SKA Organisation. 2012-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "SKA site bid outcome" (इंग्रजी भाषेत). SKA Africa. 2016-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "SKA Project" (इंग्रजी भाषेत). SKA Organisation. 28 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "The SKA Organisation" (इंग्रजी भाषेत). SKA Organisation. 28 October 2014 रोजी पाहिले.
- ^ UK to be giant telescope's HQ.
- ^ Redfern, Martin (31 March 2011).
- ^ a b "The organisation" (इंग्रजी भाषेत). 2012-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-04 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2013-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-04 रोजी पाहिले.
- ^ "Sweden joins global radio telescope project" (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "India's National Centre for Radio Astrophysics becomes the 11th full SKA Organisation member" (इंग्रजी भाषेत). 11 August 2014 रोजी पाहिले.
- ^ "भारतीय 'स्का' संघटनेची स्थापना".[permanent dead link]
- ^ "Germany joins SKA, praises SA" (इंग्रजी भाषेत). 18 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "Deutschland beteiligt sich an SKA-Riesenteleskop". 18 June 2012 रोजी पाहिले.
- ^ William Garnier. "Germany announces its intent to leave the SKA Organisation" (इंग्रजी भाषेत). 10 June 2014 रोजी पाहिले.
- ^ "The SKA Layout". SKA Telescope (इंग्रजी भाषेत). 5 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "How will SKA1 be better than today's best radio telescopes? [image]". SKA Telescope (इंग्रजी भाषेत). 5 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "SKA1" (इंग्रजी भाषेत). 2016-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "SKA2" (इंग्रजी भाषेत). 2016-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 October 2015 रोजी पाहिले.