स्क्रिप्टिंग लाइव्ह्‌ज (पुस्तक)

स्क्रिप्टिंग लाइव्ह्‌ज : नॅरेटिव्ह्‌ज ऑफ डॉमिनंट विमेन इन केरल[१] हे पुस्तक शर्मिला श्रीकुमार या लेखिकेने लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक केरळमधील प्रभावशाली स्त्रियांच्या अनुभवांचा शोधात्मक अभ्यासावर आधारित आहे. ते २००९ मध्ये ओरियंट ब्लॅक स्वान या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले.

मुख्य युक्तिवाद संपादन

या पुस्तकात समकालीन केरळातील प्रभावशाली स्त्रियांच्या व्यक्तiनिष्ठतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. 'खऱ्या/अस्सल मल्याळी स्त्रिया' ही कल्पना समजावून देण्यासाठी लेखिका विविध वैयक्तिक कथानकांचा उपयोग करते. जेव्हा सर्वसामान्य स्त्रियांमधील समजुतीमाणे प्रभावशाली स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा तुलनेने कमी शोषणाला सामोरे जाव लागत होते, अशा काळतली ही कथानके आहेत. हे पुस्तक वरच्या जातीतील स्त्रियांच्या स्वत्वाचा शोध तर घेतेच पण त्याशिवाय इतर प्रभुत्वहीन जातीतील स्त्रियांनी 'वरच्या जातीतील स्त्रियांबाबतील' केलेल्या टीकांचाही परामर्श घेते. या पुस्तकात अनुभवांबाबतीतील चिंतन, त्यामधील वाटाघाटी व त्या सिद्ध कशा होतात याबाबतीतला अभ्यासही मांडलेला आहे.

संदर्भसूची संपादन

  1. ^ ISBN-13: 978-8125036807